पुणे:कर्नाटकमधील हिजाब वाद प्रकरणातून मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवण्यासाठी आज पुण्यातील महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध आंदोलन केले. कर्नाटकमधील भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला.या आंदोलनाप्रसंगी महिला देशातील विविध परंपरांच्या वेशभूषेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख , सौ.मृणालिनी वाणी, सुषमा सातपुते, दिपक जगताप , झुबेर शेख , समीर शेख, ॲड.रुपाली ठोंबरे , अजिंक्य पालकर , विक्रम मोरे
आदींसह मोठ्या प्रमाणात विविघ समाजातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप म्हणाले की” हे आंदोलन कुठल्याही समाजाच्या महिलांच्या समर्थनार्थ नसून समाजातील प्रत्येक ती स्त्री जिच्या मूलभूत हक्कांवर , व्यक्तिस्वातंत्र्यावर भारतीय जनता पार्टी आपली तालिबानी विचार लादू पाहत आहे , त्या स्त्रियांच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा आहे. रतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत कुठेही पाश्चिमात्य वेशभूषा परिधान केलेल्या महिला व मुलींना नावे ठेवतात तर दुसरीकडे त्याच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हिजाबला विरोध करत आहेत ही एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरीच आहे. अश्या प्रकारचा दुट्टपीपणा भाजपा नेहमीच करीत असते “.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या पवित्र भारतीय संविधानात सर्व नागरिकांना संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. यात भारतातील सर्वच नागरिकांना धर्माचे, अभिव्यक्तीचेही स्वातंत्र्य देण्यात आले. परंतु भारतीय संविधानाबद्दल आकस बाळगणाऱ्या भारतीय जनता पार्टीने नागरिकांचे हे स्वातंत्र्य हिरावण्यास सुरुवात केली आहे. याच षडयंत्राचा भाग म्हणून कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मुस्लिम समाजातील हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली. यास समाजातून विरोध सुरु होताच इतरधर्मीय विद्यार्थ्यांना मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनींच्या विरोधात भडकावण्यात आले. भाजप म्हणजे द्वेष, भाजप म्हणजे हिंसा, भाजप म्हणजेच ‘सत्तेसाठी काहीही’ ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटकमधील ही घटना हा याचा पुरावाच आहे. विद्यार्थिजीवन म्हणजे देशाचे भविष्य घडवण्याचा काळ असतो, याच काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मनात धार्मिक द्वेष पेरला जातोय.