“विकासाचा महामार्ग”

Date:

शहरी भागामध्ये सुविधा पुरवतानाच नागरी जीवन सुखकर करण्यासाठी गेल्या दोन वर्षात नगरविकास विभागाने विविध निर्णय घेतले असून या निर्णयांची अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या माध्यमातून अधिक सुखकर प्रवासाकरिता उभारण्यात येणारे रस्ते प्रकल्प विकासाचे राजमार्ग ठरत आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदूमिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून पादपीठ 30 मीटर (100 फूट) उंच व पुतळा 106.68 मीटर (350 फूट) वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच आता पुतळा 136.68 मीटर उंचीचा (450 फूट) करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुधारित अंदाजित खर्च 1089.95 कोटी रुपये अपेक्षित आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथील महापौर निवास परिसरातील जागेवर प्रस्तावित केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीस 28 फेब्रुवारी 2021 च्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित मान्यता देण्यात आली आहे. सुधारित आराखडयाप्रमाणे दोन टप्प्यांमधील कामांसाठी 400 कोटी रुपयांचे ढोबळ अंदाज पत्रक तयार केले आहे.

मेट्रोची कामे प्रगतिपथावर

यंदाच्या वर्षी राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर येथील मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 2021-22 यावर्षासाठी 3693.14 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने जोडण्यासाठी नागपूर शहर आणि परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गांवर आधारित आधुनिक वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रोट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महामेट्रोच्या सुमारे 305 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गिका क्र. 1-ए या उन्नत मेट्रो मार्गाच्या अंमलबजावणीस सुधारित मान्यता देण्यात आली आहे.

नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम सुधारणेनुसार नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर महानगरपालिका आणि नगरपरिषदेत देखील बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण :महाराष्ट्र सर्वोत्तम

 ‘स्वच्छ शहर’ पुरस्कारामध्ये विटा, लोणावळा आणि सासवड या नगरपालिकांनी देशात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे देशातील एकूण पुरस्कारांच्या 40 टक्के पुरस्कार या वर्षी महाराष्ट्राला मिळाले ही अभिमानाची बाब आहे. फाईव्ह स्टार मानांकनांमध्येदेशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. नवीमुंबई महापालिका महाराष्ट्राच्या  पहिल्या वॉटरप्लस सर्टिफिकेटची आणि सफाई मित्रसुरक्षा चॅलेंज द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

महत्त्वाचे निर्णय

  इलेक्ट्रिक वाहनधोरण 2021– इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन्स उभारणाऱ्या स्थानिक नाग़री संस्थांमधील नागरिकांना, गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे. त्याशिवाय मा. बाळासाहेब ठाकरे माजीसैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील माजीसैनिकांना देखील मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत गेल्या दोन वर्षात 1301 कोटी रुपये किमतीच्या 23 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच इतर नियोजन प्राधिकरणां करिता एक त्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकापोटी आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्ये सवलत दिली आहे. ही सवलत सध्या सुरू असलेल्या व नव्या प्रकल्पांना लागू आहे. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिनियमात सुधारणा

31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या ठिकाणी गुंठेवारी योजना झाल्या आहेत परंतु त्यांचे नियमितीकरण झालेले नाही त्यांना या अधिनियमातील दुरुस्तीचा लाभ घेता येणार आहे. शासनाच्या ताब्यात आलेल्या 5 टक्के स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका शासकीय विभागांनी मागणी न केल्यास व मागणी शिवाय शिल्लक असलेल्या सदनिका जाहिरातीद्वारे वाटप करण्यासाठी म्हाडाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनावरील उपचारांसाठी मुंबई आणि एमएमआर प्रदेशात आरोग्याच्या जम्बो सुविधांची निर्मिती या विभागाने केली आहे. वांद्रे-कुर्लासंकुल, मालाड (प.), कांजूरमार्ग, कांदरपाडा डेपो, रिचर्डसन व क्रुडास कंपनी परिसरात आणि पनवेल व उरण भागात कोविड हेल्थसेंटर्स तसेच दहिसर जकात नाका येथे अलगीकरण केंद्र उभारली. कोविडमुळे लावलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले- पथविक्रेत्यांना, अधिकृत सायकल रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.

महामार्गांचे काम प्रगतिपथावर

राज्यातील रस्त्यांचा विकास, बांधकाम आणि देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकासमहामंडळ कार्यरत आहे. नागपूर-मुंबई दरम्यान बांधण्यात येणार्‍या 701 कि.मी. लांबीच्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ’हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्यात आले असून, आजपर्यंत या प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. नांदेड शहरातील रस्ते व गोदावरी पूल ही कामे नांदेड-जालना या 194 कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्ग या प्रस्तावित रस्त्याचा भाग म्हणून घेण्यास मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली आहे. एकूण साडेसहा हजार कोटी रुपये अंदाजित किमतीचा हा प्रकल्प असून नांदेडशहर व परभणी, हिंगोली जिल्हे समृद्धी महामार्गास जोडण्यासाठी लवकरच काम सुरू होणार आहे.

रस्ते प्रकल्पांना गती

मुंबई-पुणे (यशवंतराव चव्हाण) द्रुत गतीमार्गाची क्षमता वाढ करण्यात येत असून 10.50 कि.मी. लांबीचे 2 भुयारी मार्ग आणि 2 कि.मी.चे 2 लांब पूल अशा 6695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू या 17.17 कि.मी. लांबीच्या 11 हजार 333 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ठाणे खाडीपूल क्र. 3 या 1837 मीटर लांबीच्या रुपये 776 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या नवघर ते बलावलीप्र कल्पाच्या (सुधारित) प्रस्तावित केलेल्या 39841.93 कोटी रुपये

एकनाथ शिंदे

मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...