महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे

Date:

पुणे- कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नोकरीस असून, विद्यापीठाच्या आवारातील क्वॉर्टरमध्येच राहतात. त्या सहा जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता, त्यांनी बल्ब लावण्यासाठी ‘स्वीच ऑन’ केला. मात्र, बल्ब लागला नाही. त्यानंतर छुप्या कॅमेऱ्यांचा प्रकार समोर आला. हे छुपे कॅमेरे बल्बमध्ये लावले होते.या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार सहा जुलैला सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सात वाजून २० मिनिटे या कालावधीत घडला. फिर्यादी सकाळी ड्युटीला गेल्यानंतर अज्ञाताने बनावट चावीच्या सहाय्याने त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधिताने छुपे कॅमेरे असलेले बल्ब घरात बसवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.दरम्यान, तो बल्ब काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली. त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला. तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने घरातील अन्य दिव्यांची पाहणी केली. त्यात बेडरूममध्येही असाच बल्ब लावल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यासह महिला पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील महिला निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...