हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी

Date:

पुणे -महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांची शुक्रवारी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, आमदार सुनील कांबळे, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी यावेळी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली होती. उभे राहून, हात वर करून, प्रभागाचे नाव सांगून सदस्यांचे मतदान घेण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रवादी-काँग्रेस -शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक कांबळे यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. महेंद्र पठारे, अशोक कंबळे, वैशाली मराठे, विशाल धनवडे, अशा 6 सदस्यांनी मतदान झाले. यावेळी रासने यांना 10 तर, महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक कंबळे यांना 6 मते मिळाली.

त्यानंतर हेमंत रासने यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. दीपक पोटे, दिलीप वेडे-पाटील, उमेश गायकवाड, हेमंत रासने, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, हिमाली कांबळे, सुनील कांबळे, प्रकाश ढोरे अशा 10 सदस्यांनी मतदान केले. त्यांनतर हेमंत रासने निवडून आल्याचे नयना गुंडे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक गणेशभक्त कार्यकर्ता ते आज युवा, अभ्यासू, कार्यतत्पर, सर्वसामान्य व प्रगल्भ नेतृत्व ते शहराचे प्रभारी हा त्यांचा प्रवास असाच नेत्रदीपक आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच 1986 -1987 साली विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणून संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. या कामासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून मिळालेली शिस्त ‘संघटन मै शक्ती है’ या सूत्रांतून शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आशा सर्वच उपक्रमांतून मित्रमंडळींना सोबत घेऊन कार्य करण्याची ही सवय त्यांची आहे.

सुवर्णयुग बँकेत कार्यरत असताना लेखनिक हुद्यावरून सुरवात रासने यांनी 7 वर्षे संचालक व 2 वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न महापालिकेत मांडण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी सन 2002 साली भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली.

गणेशोत्सव कार्यकर्ता म्हणून सुरू असलेले कार्य व त्यांच्या अष्टपैलू गुणांची दाखल घेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यांची सन 2014 साली विश्वस्तपदी निवड केली. भाजपने 2012 आणि 2017 साली उमेदवारी दिली. 2017 च्या निएडणुकीत पुणे शहरात पुरुषांमध्ये शहरात सर्वात जास्त मते मिळविण्याचा बहुमान रासने यांना मिळाला. यावर्षी स्थायी समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आता ते या समितीचे अध्यक्ष झाले.

पुणे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत असताना प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा उपलब्ध करून देणे, पुण्याचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे सुशोभीकरण व तो मूळ स्वरूपात 7 मजली पुनर्बांधणी करावा, यासाठी पुरातत्व विभागाशी पाठपुरावा, 205 फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणे, ऐतिहासिक नानावडाचे सुशोभीकरण तसेच शहरातील वाहनचालकांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मध्यवर्ती भागातील 7 सिग्नलवर एकूण 20 ठिकाणी कापडी छप्पर, असे अनेक उल्लेखनीय कार्य केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...