मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले

Date:

ढगांचा गडगडाट अन् विजेच्या कडकडाटात अनेकांच्या मनात भरविली धडकी

पुणे- आज सायंकाळी अखेर तो आलाच … जोरदार एन्ट्री करत त्याने धो धो पुण्याला झोडपले .आणि पाहता पाहता महापालिकेच्या ड्रेनेज ची अवस्था उघड्यावर पडली अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्या नाल्यांचे रूप आले. काही काळ तर रस्त्यावरून दुचाक्या नाहीश्या झाल्या . पण अखेरी तो काही ऐकेना .. सुमारे साडेपाच ला बरसू लागलेला मुसळधार पाउस रात्री ८ वाजले तरी सुरूच होता .ढगांचा गडगडाट अन् विजेच्या कडकडाटात अनेकांच्या मनात या पावसाने धडकी भरविली .व्होल्गा चौक , स्वारगेट , पर्वती दर्शन , बालागान्ध्रव रंगमंदिर चौक ,अरण्येश्वर , कोथरूड , हडपसर ,केशवनगर, मुंढवा, घोरपडी, पिंगळेवस्ती, कोरेगाव पार्क परिसरात जोरदार पाऊस झाला. येथील विविध ठिकाणांहून पाणी रस्त्यावरून वाहत होते .असंख्य वाहनचालकांची त्रेधा त्यामुळे उडाली तर विना वाहन घराबाहेर पडलेल्यांना बस मिळणे ,रिक्षा मिळणे दुरापास्त होत होते .महर्षीनगर पोलीस चौकी ते सॅॅलसबरी पार्क रस्त्यावर सायंकाळी ६ वाजण्यापूर्वीच पावसाच्या पहिल्या तडाख्यातच एक मोठ्ठे झाड उन्मळून पडले .

नागरिकांना अडचण आल्यास किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आपण संपर्क करावा यासाठी आपल्या माहिती साठी सोबत पुणे महानगरपालिका अधिकारी मोबाईल नंबरची लिस्ट येथे देत आहोत .

पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष ! मदतीसाठी संपर्क साधा आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र ०२०-२५५०६८००/१/२/३/४ ०२०-२५५०१२६९

महापौरांचे आवाहन –

पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा.

महापौरांनी आवाहन करत हा फोटो शेअर केला आहे.

दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या दमदार पावसाने दिलासा दिला. आज उकाडा जाणवत होता. सायंकाळी अचानक आकाशामध्ये ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक, रवीदर्शन, मांजरी फाटा, पंधरा नंबर, तसेच हडपसर-सासवड रस्त्यावर तुकाई दर्शन चौक, भेकराईनगर आगारासमोर सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीचालकांची तारांबळ उडाली. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे काही दुचाकीस्वारांना अपघात झाला. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. फुरसुंगी परिसरातील तुकाई दर्शन, भेकराई नगर परिसरात ड्रेनेज लहान असल्याने पाणी रस्त्यावर वाहत जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

वाघोली परिसरात चाकरमान्यांचे हाल

या पावसाने सर्वच चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडवली. तर वाघोली परिसरात जोरदारपणे पडलेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी होते. केसनंद रोडचे काम चालू असल्याने अनेक वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी आणि रस्ता चिखलमय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे पुणे नगर रस्त्यावरदेखील वाहतूक कोंडी झाली होती. विजांच्या लखलखाट आणि कडकडाटामुळे पाऊस जोरदार कोसळत असल्याने वाघोली परिसराचा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला होता. एक तास झालेल्या जोरदार पावसामुळे चाकरमान्यांचे खूप हाल झाल्याचे पाहायला मिळत होते. तर अनेकांच्या दुचाकी रस्त्यावर बंद पडल्याचे दिसून येत होत्या.

सुतारवाडी येथे साचले गुडघाभर पाणी

सुतारवाडी स्मशानभूमीजवळ जोरदार पावसामुळे अवघ्या काही मिनिटातच गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. पालिकेने केलेल्या पावसाळी गटाराच्या स्वच्छता कामाची देखील पोलखोल झाली. साखरेला पाण्यामध्ये दुचाकी बंद पडत होत्या, तर स्मशानभूमीकडे जाणारा रस्तादेखील बंद होता. गुडघाभर असलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत होती. अवघे पाच ते दहा मिनिटांत पडलेल्या पावसामध्येही परिस्थिती उद्भवली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...