पुणे, ता. ३ – ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’मध्ये जागतिक ह्दयदिनानिमित्त प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना साठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सकस आहार, आवश्यक व्यायाम आणि पुरेशी विश्रांती ही आदर्श जीवनशैली हृदयरोग टाळण्यासाठी महत्त्वाची असल्याचे मत मत डॉ. साठे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर अध्यक्षस्थानी होते. प्रभारी प्राचार्या डॉ. स्नेहल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रजनी पगारे, डॉ. श्रेया ढाके, डॉ. आदिती सोमण, डॉ. आदिती बेरी यांनी संयोजन केले.

