- आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या पोस्ट कोविड आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे- कोरोनावर ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे; मात्र, ज्यांना अजूनही आरोग्याच्या तक्रारी आहेत, अशांसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आज कोथरुडमध्ये मोफत पोस्ट कोविड आरोग्य व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात केले होते. या शिबिराला कोथरुडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आपली आरोग्य तपासणी केली. जवळपास २५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. तर १५० पेक्षा जास्त जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत पुण्यामध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. मात्र, कोरोनावर ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे; यापैकी बऱ्याचजणांना आरोग्याच्या तक्रारी आहेत, अशांसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आज कोथरुडमधील महेश विद्यालय येथे पोस्ट कोविड आरोग्य व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, मोफत आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी; आणि मानसोपचार तज्ज्ञांचेही मार्गदर्शन करण्यात येणार होते. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रॅन्डम शुगर टेस्ट, हिमोग्राम, सीआरपी, डी-डायमर आदीच्या तपासण्या देखील केल्या जाणार होत्या. या शिबिराला कोथरुडकरांनी चांगला प्रतिसाद देत, आपली आरोग्य तपासणी करुन घेतली. यामध्ये जवळपास २५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. तर १५० पेक्षा जास्त नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली.
यामध्ये डॉ. अजित डेंगळे, डॉ. नितीन पाटील, डॉ. सुमित अगरवाल, डॉ. संजय गांधी, डॉ. नितीन धांडे, डॉ. प्रशांत बोरुडे, समुपदेशक अभय ठकार सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात केली, तर १५० पेक्षा जास्त जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी या शिबिराला श्री. पाटील यांनी भेट देऊन, सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कोथरुड मधील सर्व नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

