जलसंपदा विभागाचे मुंडे यांची अखेर बदली…

Date:

पुणे-जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांची राज्य सरकारने औरंगाबाद येथे बदली केली असून, त्यांच्याजागी जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्रकुमार मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सुरू असलेल्या वादात मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

मुंडे यांची मोहिते यांच्या जागेवर बदली करण्यात आली असून, या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारने मंगळवारी याबाबतचा अध्यादेश काढला आहे. मुंडे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचा आधार घेऊन पुणे महापालिकेला ८.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी घ्यावे लागेल, अशी भूमिका घेतली होती. त्यावरून जलसंपदा आणि पुणे महापालिका यांच्यात वाद उफाळून आला होता. ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने अखेर मुंडे यांची बदली करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

राज्य सरकारने बदली झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांबाबत आदेशात सूचना केल्या आहेत. त्यानुसार सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्याचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यास मूळ पत्त्यावर परत करावेत. बदली झालेल्या अधिकाऱ्याने रजेचे अर्ज पाठविल्यास त्या अर्जाची दखल घेण्यात येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

या बदलीच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचे उल्लंघन करणारी असल्याने ती गैरवर्तणूक समजून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव! पुणे: पुणे महानगरपालिकेतील...

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर...

स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी ऍक्सिस बँकेची एमएसएमईसाठी रूफटॉप सोलर फायनान्स योजना

मुंबई, 5 फेब्रुवारी, 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या...

महात्मा गांधी यांची ७८ व्‍या पुण्यतिथी दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त...