पुणे– येथे महाराष्ट्रातील कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेले नेते ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रातील नव्या मंत्र्यांसोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटी गाठी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात एकीकडे राणे जसे भाजपा विरोधकांना टक्कर देऊ शकतात तसेच हर्षवर्धन यांचीही ताकद भाजपातील नेते मांडली जाणून असल्याने या भेटींना राजकीय महत्व प्राप्त होते आहे . हा भेटी गाठींचा कार्यक्रम महाराष्ट्रातील भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच सल्ल्याने घेतल्याचे बोलले जाते आहे.
दरम्यान या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यालयातून मात्र या भेटीगाठी राजकीय कारणास्तव नसल्याचे सांगण्यात आले , भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या भेटीत नूतन केंद्रीय मंत्र्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवरती चर्चा केलीअसे मात्र म्हटले आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या अधिकृत सूत्रांनी असेही सांगितले कि,’ नवी दिल्ली येथे बुधवार व गुरुवारी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नूतन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी या सर्व नेत्यांची हर्षवर्धन पाटील यांची विविध विषयावरची चर्चा झाली. या चर्चेत राज्यातील विकास कामांसाठी व भाजप पक्षवाढीसाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. दरम्यान, नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत पालखी मार्गांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचबरोबर विविध रस्ते, पूल, भुयारी मार्ग यांच्या कामासाठी मागणी केल्यानंतर तात्काळ निधी उपलब्ध करून दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले.
हर्षवर्धन पाटील यांनी घेतली गडकरी ,राणेंची भेट -राजकीय चर्चांना उधाण
Date:

