व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा
पुणे: महाराष्ट्राच्या हर्षल दाणी, पुष्कराज कुंभार, अनिरुद्ध मयेकर, ओंकार पालकर यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती वरिष्ठ गटाची अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आगेकूच केली.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पीवायसी, लक्ष्मी क्रीडा मंदिर आणि सीओईपी इंजिनीअरिंग कॉलेजच्या कोर्टवर या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत.
पहिल्या फेरीत अग्रमानांकित हर्षल दाणीला पुढे चाल मिळाली होती. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत राजस्थानच्या शुभम पटेलला १५-६, ५-१५, १५-८ असे नमविले. पुष्कराजलाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्याने दुसऱ्या फेरीत दिल्लीच्या हर्ष राणाला ९-१५, १५-१२, १५-१३ असे नमविले. यानंतर अनिरुद्ध मयेकरने पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्याच प्रणव कांबळेला १५-११, १५-९ असे पराभूत केले, तर दुसऱ्या फेरीत प्रांशू शर्मावर १५-८, १५-५ असा विजय मिळवला. यानंतर ओंकार पालकरने सचिन रावतवर १५-११, १०-१५, १५-१३ असा विजय मिळवला. पहिल्या फेरीत ओंकारला पुढे चाल मिळाली होती. वसीम शेखने दारस लिबर्टीवर १५-७, १५-५ असा विजय मिळवून आगेकूच केली.
पात्रता फेरीचे काही निकाल : पुरुष एकेरी : दुसरी फेरी – वेदांत शर्मा वि. वि. वेदांत सरदेशपांडे १५-५, १५-८, आयूष बम्मू वि. वि. प्रणव लोखंडे १५-५, १५-८, सात्विक प्रशार वि. वि. सिद्धेश पालवे १५-४, १५-१२, अंकित मोंडल वि. वि. पार्थ भूसार १५-६, १५-५, नवनीत मनकेनपल्ली वि. वि. कृष्णा जसूजा १५-१३, १०-१५, १६-१४, सनतकुमार पटवर्धन वि. वि. दिनेश बडिगेर १५-८, १५-८, मानव चौधरी वि. वि. ऋतुराज घोरपडे १५-६, १५-४, हृतिक सी. वेदांत कोळवणकर १५-११, १५-१०, सलमान महंमद वि. वि. समरजित पांडे १५-१२, ११-१५, १६-१४, अनिरुद्ध नायर वि. वि. रजत भारद्वाज १५-७, १५-११, रोहन गुरबानी वि. वि. लकी बाडलिया १५-४, १५-७.
पुरुष एकेरी : पहिली फेरी – शुभम पटेल वि. वि. नितीन मेहरा १५-९, १५-८, आयूष बाम्मू १५-५, १५-२, यश कुलथे वि. वि. अतीक्ष जाठर १५-१३, १५-१७, १५-११, साहिल ठाकूर वि. वि. सिद्धार्थ देशपांडे १५-११, १५-११, यश पवार वि. वि. राहुल डी. १५-८, १५-६, प्रभू के. वि. वि. आदित्य त्रिपाठी १५-११, १५-१३, विनयकुमार रेड्डी वि. वि. अंश मेहता १५-९, १७-१९, १५-१३, पार्थ भूसार वि. वि. प्रमोद १५-११, १५-९, श्री गुणा श्रीकर वि. वि. आर्यवीर देशमुख १५-८, १५-३, कृष्णा जसुजा वि. वि. आकाशसिंग राजपूत १५-११, १५-९, शशांक शेखर सिंग वि. वि. आदित्य पिंपळनेरकर १५-१०, १५-९, ऋतुराज घोरपडे वि. वि. ब्रिजेंद्र परिहार १५-८, १५-९, समरजित पांडे वि. वि. उज्ज्वल नारद १५-१३, १५-११, अनिरुद्ध नायर वि. वि. अंकुश जोशी १५-६, १५-८, सिद्धार्थ दास वि. वि. निहाल पाटील १५-८, १२-१५, १५-१३, हर्ष शर्मा वि. वि. अहान पाठक १५-९, १५-६.

