महापालिकेच्या सुरक्षारक्षकांची पिळवणूक :क्रिस्टलवर कारवाई ची ‘आप ‘ची मागणी;आयुक्त विक्रमकुमार दबावाखाली असल्याचाही आरोप

Date:

पुणे-महापालिकेतील सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि त्यांचे वेतन थकवणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED कंपनीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आप च्या वतीने करण्यात आली आहे.आप चे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी सांगितले कि,’अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना याबाबत चे लेखी निवेदन देण्यात आले आहे. भाजपचे विधान परिषदेतील सर्वात श्रीमंत आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर सत्ताधारी भाजप – शिंदे सरकारचा राजकीय वरदहस्त असल्याने तिच्या विरोधात अद्यापही कोणतीही प्रशासकीय व फौजदारी कारवाई होत नाही. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा अहवाल कामगार कल्याण विभाग व सुरक्षारक्षक विभागाने दिलेला आहे अशी आमची माहिती असून पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नाहीत, ही अतिशय खेदाची बाब आहे.असाही आरोप आपच्या वतीने करण्यात आला आहे असेही मोरे यांनी सांगितले आहे.

मोरे म्हणाले,’पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील शेकडो कंत्राटी सुरक्षारक्षकांचे जून २०२२ पासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत चार महिन्यांचे वेतन तर काही कामगारांचे त्याहून अधिक महिन्यांचे वेतन क्रिस्टल कंपनीद्वारे थकीत झाले असल्याची बाब आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहेत. कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे आहे. केलेल्या कामाचे वेतन न देणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन दिले की नाही हे तपासणे आणि दिले नसल्यास त्यांना द्यायला लावणे व कामगार हिताच्या तरतुदीला हरताळ फासणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे

तरी वारंवार सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवणाऱ्या, कराराचा भंग करणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर दंडात्मक कारवाई करत तिला काळ्या यादीत टाकावे, ही विनंती. अन्यथा पालिकेतील कंत्राटी कामगारांना संघटीत करत आम आदमी पक्षाला आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी महापालिका आयुक्त यांची असेल.असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...