पुणे –पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी फ्लॅटसाठी शिविगाळ करत हाताने मारहाण करून त्रास दिल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने पतीने आत्महत्या केली.मुंढ्वा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.याप्रकरणी पत्नीसह तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ झा (वय 31) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी ,पत्नीचा भाऊ, पत्नीचे वडील यांच्यासह चार जणविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाची आई शामल किशोर झा यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपींनी पैशासाठी आणि बेंगलोर येथील फ्लॅट घेण्यासाठी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पैसे देत नसल्याने फिर्यादीच्या मुलाला अनेक मार्गानी त्रास दिल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. याच त्रासातून त्याने चार डिसेंबर रोजी आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबीय विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.


