पुणे-पुण्यात विविध कार्यक्रमांनी आज बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कामयानी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद या विशेष मुलांसोबत जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे या मुलांसोबत आगळावेगळा बालदिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी या बालचमूंनीसाठी ट्याटू पैंटिंग करून त्यांच्या हातावर काढण्यात आले.त्याच बरोबर मुलांचे स्केच कडून देण्यात आले. या विशेष मुलांनी केक कापून पंडिजींच्या नावाच्या घोषणा देखिलदिल्या त्याच बरोबर फ्रेंच फ्राईन्स, कॅडबरी,केक,फुगे व आईस्क्रीम या सर्व गोष्टींचा आनंद लुटला.
त्यांची आनंदी मुद्रा पाहून सर्वच भावुक झाले होते. यंदाचे या मुलांसोबत बालदिन साजरे करण्याचे हे ५ वे वर्ष असून गेली २० वर्ष समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसोबत तसेच विशेष मुलांसोबत त्यांना आनंद देऊन बालदिन साजरा करण्यात येतो. या विशेष बालदिनाचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी केले होते. या प्रसंगी कामायनी संस्थेतील कालिदास सुपाते,श्रीलेखाताई कुलकर्णी ,सागर आरोळे,अभिषेक बागुल,इम्तियाझ तांबोळी,संतोष पवार, गोरख मरळ,सुरेश कांबळे,राजाभाऊ पोळ,महेश ढवळे , बाबासाहेब पोळके , सुधीर सोनावणे , अभिजित गायकवाड,भाऊसाहेब दोडके,मनीषा निंबाळकर आदी उपस्थित होते
डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल
प्री-प्रायमरी शाळेत मुलांनी मेरी गो राउंड, जंपिंग जॅक, संगीत खुर्ची या खेळांचा आनंद लुटला. प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मौज जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत विविध खेळ आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा अनुभव घेतला. सेकंडरी स्कूलमध्ये मेहंदी, रांगोळी, सॅलड डेकोरेशन, फेस पेंटिंग, टी शर्ट पेंटिंगचे आयोजन करण्यात आले होते.
बाल दिनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल मध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ,संगीत खुर्ची ,गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . विजेत्यांना बक्षिसे ,खाऊ ,प्रमाणपत्रे देण्यात आली . मुख्याध्यापक आयेशा शेख ,शिक्षिका साजेदा खान यांनी बाल दिनाचे महत्व आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला .
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत बालदिनानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी झुम्बा नृत्याचे सादरीकरण केले.
रानडे बालक मंदिर
रानडे बालक मंदिरात चित्रकला स्पर्धा, पपेट शो, कीर्तन, राजीव तांबे यांचे कथाकथन, ‘लंडन बस’मधून सफर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.