तुळशीबागेत हनुमान जयंती सोहळा थाटात साजरा

Date:

  • श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे हनुमान जन्माचे कीर्तन.

पुणे :नाम मारुतीचे घ्यावे…पुढे पाऊल टाकावे…अशा शब्दांत हनुमानाच्या चरित्राचे वर्णन करीत हनुमान जन्माचे कीर्तन पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात पार पडले. राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे व दागिने घालण्यात आले होते. तर, मंदिरावर आकर्षक फुलांची व झुंबरांची सजावट देखील करण्यात आली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन झाले. याशिवाय श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची प्रवचनमाला, लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा देखील पार पडला. उत्सवादरम्यान पं.रघुनंदन पणशीकर, गायिका सावनी दातार व शिल्पा पुणतांबेकर, संपदा वाळवेकर व सहका-यांचे गायन, आनंद भीमसेन जोशी, प्रख्यात गायक आनंद भाटे, चैत्राली अभ्यंकर गायनाचा कार्यक्रम तसेच हिमांशु बक्षी यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम देखील पार पडला. याशिवाय धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून...

गॅस एजन्सीवर ही कारवाई, गॅस सिलेंडरचा काळा बाजार

गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ;...

श्रीरामराज्याभिषेक व पायघडी सोहळा तुळशीबागेत उत्साहात साजरा

पुणे : श्रीराम जय राम जय जय राम...  रघुपती...

देशभरातील 76 रेल्वे स्थानकांवर सर्व अत्याधुनिक सुविधांमधे वाढ – अश्विनी वैष्णव

सर्व विभाग आणि यंत्रणा, एकाच स्थानक संचालकांच्या हाताखाली काम...