अतिथि देवो भव: (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

‘हॅलो, तुम्ही सगळे कसे आहेत? गेल्या वर्षी फेब्रुवारीत तुम्ही सिडनीला आमच्या घरी होतात आणि आपण सगळ्यांनी खूप धमाल केली होती.’ झमीर भाई आणि हेतल भाभीचा आपुलकीने चौकशी करणारा फोन आला. त्यांच्या बरोबर गप्पांमध्ये आम्हीही रमून गेलो, आणि हृदयाच्या कप्पात जपलेल्या आठवणी पुन्हा उमलून आल्या. ऑस्ट्रेलियाच्या आमच्या ट्रीपला बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं! २०१९च्या आक्टोबरमध्ये आम्ही ठरवलं होतं की २०२०च्या फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाला म्हणजेच मेलबर्नला भावाकडे जायचं. खरंतर आधी मी, माझा मुलगा आणि ज्योती ताई (माझी आत्येबहीण) असे तिघेच जाणार होतो; पण मग सासूबाई आणि नवरोबाही तयार झाले. इतक्या लांब इतका खर्च करून जाणार तर फक्त मेलबर्न न बघता ३-४ दिवसांसाठी सिडनीलाही जायचं नक्की झालं. सिडनीला कुणी नातेवाईक नव्हते त्यामुळे तिथे कुठे राहायचे, हॉटेल्स किंवा होम  स्टे कसे आहेत याची माहिती काढायचे ठरवले. ओमकारने सांगितले, ‘आई, आपल्या सोसायटीत माझा जो मित्र राहायचा- हेमांग बारोट, त्याचा चुलत भाऊ देवांग सिडनीला राहतो. त्याला मी सगळी माहिती विचारतो.’ देवांग सुट्टीत बऱ्याचदा हेमांगकडे राहायला यायचा, त्यामुळे ओमकारशी बऱ्यापैकी गट्टी झाली होती.

ऑस्ट्रेलियाला जायचे ठरल्यावर मग तिकीट, व्हिसासाठी जोमाने तयारीला लागलो. काही दिवसांनी ओमकारने सांगितले – आई, माझे देवांगशी बोलणे झाले. तो म्हणाला की हॉटेल्स आणि होम स्टेबद्दल काही जास्त माहिती नाही. मी घरी विचारून सांगतो पण तुम्ही आमच्याच घरी या. इकडे देवांग आणि ओमकारचे नेहमीप्रमाणे चॅटिंग सुरूच होते. सिडनीला बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत, कुठले बुकिंग ऑनलाईन होते का…आम्हीही आमच्या परीने माहिती काढत होतोच. हॉटेल्स ऐवजी होम स्टेचा पर्याय रास्त वाटत होता. मध्यंतरीच्या काळात  देवांगनेही घरी आईबाबांना सांगितले होते की दहिसरहून ओमकार भाई आणि त्याची फॅमिली येत आहे. ते ऐकून त्याच्या आईने म्हणजेच हेतल भाभीने ‘त्यांना आपल्याकडेच यायला सांग’ असे सुचवले. आणि एक दिवस हेतल भाभीचाच मला समोरून फोन आला…’भाभी तुम्ही सगळे येत आहात असे कळले आहे. देवांगला तर खूप आनंद झाला आहे. ओमकारभाई सोबत वेळ घालवायला मिळणार म्हणून. सिडनीला तुम्ही सगळे आमच्याचकडे राहायला या.’ पहा ना, कुठलही नातं नाही, ओळखपाळखही नाही खूप वर्षांची…तरीही भाभी अगत्याने  बोलावत होत्या. ‘आम्ही एक-दोन नाही तर पाच जण येणार आहोत; त्यामुळे राहायला येणे शक्य होणार नाही. पण आम्ही तुम्हाला भेटायला नक्की येऊ’ असं मी त्यांना कळवले. सिडनीला तीन दिवस वास्तव्य करणार असल्याने निलेशने (माझ्या भावाने) होम स्टे बुक केले. ऑस्ट्रेलियाला निघण्याचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसे ओमकार देवांगला अपडेट देत राहायचा. हेतल भाभीशी सुद्धा फोनवर बोलणे व्हायचे. त्यांच्याशी बोलताना परकेपणा जाऊन आता जवळीक निर्माण झाली होती. फोनवर नेहमी – आमच्या घरीच या. आपले घर असताना तुम्ही दुसरीकडे राहाणार हे बरोबर वाटत नाही…असंच म्हणायच्या. बोलणं अत्यंत लाघवी आणि आपुलकीचं. शेवटी हो नाही हो  करता करता आम्ही होम स्टेचं बुकिंग कॅन्सल केलं आणि हेतल भाभीच्या घरी राहायला जायचं ठरवलं.

४ फेब्रुवारीला आमची मुंबईहून फ्लाईट होती मुंबई-हाँगकाँग  आणि नंतर हाँगकाँग-सिडनी. सिडनीला आम्ही ६ फेब्रुवारीला पोहोचणार होतो. त्यावेळी करोनाने जगभर नुकताच शिरकाव केला होता. आमचाही प्रवास आता कॅन्सल होतो की काय अशी धाकधूक होती. करोनामुळे हाँगकाँगला ट्रान्झिट व्हिसा घेऊन बाहेर जाता येणार नव्हते. त्यामुळे तब्बल १२ तास हाँगकाँग एअरपोर्टवर काढणं म्हणजे एक दिव्यच होतं. मुंबईहून प्रवास सुखरूप चालू झाला. हाँगकाँगवर मात्र करोनाचं सावट होतं. सगळेच मास्कधारी ना! त्यात आमची फ्लाईट अजून ४ तास उशिरा म्हणजे १६ तासाने टेक ऑफ झाली. हेतल भाभी, झमीर भाई, माझा भाऊ निलेश सगळेच आमच्या संपर्कात होते. झमीर भाई आणि देवांग आम्हाला एअरपोर्टवर घ्यायला  येणार होते. आम्हाही सगळे उत्सुक होतो त्यांना भेटायला.

६ फेब्रुवारीला आमची फ्लाईट सकाळऐवजी दुपारी सिडनीला लँड झाली त्यामुळे झमीर भाईंना काही यायला मिळाले नाही. पण फोन करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. टॅक्सीने आम्ही त्यांच्या सिडनीच्या घरी पोहोचलो. बंगल्याशी स्वागत करायला देवांग उभाच होता. हेतल भाभीना ऑफिसला जायला लागल्यामुळे त्या आम्हा सगळ्यांचे जेवण करून गेल्या होत्या. आम्हाला स्वतंत्र बेडरूम दिल्या होत्या, एवढंच नाही तर फाईव्ह स्टार हॉटेलसारखी आमची बडदास्त ठेवली होती. प्रत्येकाला टॉवेल, नॅपकिन, शाम्पू, टूथपेस्ट, डव सोप…असे पाच जणांचे पाच सेट तयार करून ठेवले होते! दुपारचे ३ वाजले होते. आमचे सगळे आवरून झाले होते, खूप भूकही लागली होती. झमीर भाई तोवर घरी आले होते. जेवण सगळं साग्रसंगीत केलं होतं, तेही आवडनिवड लक्षात घेऊन. (तरीच भाभी फोनवर आधी विचारात होत्या की तुम्हाला कुठल्या कुठल्या भाज्या आवडतात, तिखट आवडतं की गोड…या चौकशी मागचं कारण तेव्हा कळलं). जेवायला बसलो तेवढ्यात हेतल भाभीही धावतपळत ऑफिसमधून आल्या आणि त्या माऊलीने आम्हाला गरमगरम पोळ्या करून वाढल्या( *अगदी दहिसरला असल्यासारखं वाटलं!).* आमच्यातील संकोच जाऊन आता आम्ही छान रुळलो होतो. क्षणभरही वाटले नाही की यांच्याशी प्रत्यक्ष काही तासांपूर्वीच ओळख झाली आहे. छान गप्पा मारण्यात तो दिवस संपला ते पुढल्या दिवशीचं प्लॅनिंग करूनच. आमच्यासाठी हेतल भाभी आणि झमीर भाई दोघांनीही सुट्टी घेतली होती.  देवांग तर जाम खूष होता.

दुसऱ्या दिवशी सिडनीतील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार होतो. त्यादिवशी पाऊस आणि वाराही खूप होता. झमीर भाई, देवांग आणि दिव्या तिघंही आमच्या दिमतीला होते. पूर्ण दिवस सिडनी फिरून आलो. त्यादिवशी सासूबाईंची तब्येत थोडी बिघडली होती. हेतल भाभीने मायेनं त्यांची चौकशी केली आणि त्यांना काय हवं नको ते पाहिलं, त्यांची काळजी घेतली.

तिसऱ्या दिवशी सिडनीपासून थोड्या लांबच्या ठिकाणांना भेट द्यायचं ठरलं होतं. सगळेच आमच्या बरोबर आले होते, वाटेत खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ घेऊन. एवढंच नाही, तर गोड पदार्थ  खायची सवय माहीत असल्यामुळे रसमलाईसाठी बाउल, चमचे असा सगळा खाशी जामानिमा आमच्यासाठी होता. त्यांच्याशी बोलताना कुठेच आता परकेपणा किंवा संकोच नव्हता. माझ्या सासूबाईंना गुजराती येत नसले तरी त्या हिंदीतून त्यांच्याशी छान गप्पा मारत होत्या. त्यांच्या सोबतीतील ते मंतरलेले तीन दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही.

परदेशात आपल्या नात्यागोत्याचे नसून सुद्धा त्यांच्या अगत्यशील पाहुणचाराने आम्ही सगळेच खूप भारावून गेलो. त्या चौघांनीही आम्हाला क्वालिटी टाइम दिला, जो हल्ली आपण आपल्या माणसांसाठी फारसा देऊ शकत नाही. नात्याच्या, जातीधर्माच्या आणि भाषेच्या पलीकडलं हे नातं होतं ऋणानुबंधाचं! त्यांच्याकडील वास्तव्यात आम्ही सगळ्यांनी ते अनुभवलं.

हो, तिथून निघताना पावलं जड झाली होती. साश्रूपूर्ण नयनांनी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. ‘अतिथि देवो भव:’ म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने आम्हाला जाणवलं.

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर...

लता दीदी या मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्या

आदिनाथ मंगेशकर ; लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा ;...