Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुढी पाडव्यालाही महागाईच्या भस्मासुराचा दणका! पुन्हा पेट्रोल डिझेलचे भाव कडाडले

Date:

महाराष्ट्रात डीझेलचीही शंभरी पार …

12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10व्यांदा वाढ

मुंबई- राज्य सरकारने करोनाचे निर्बंध पूर्णपणे रद्द केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी आज संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे  शोभा यात्रा आणि स्वागत यात्रांनी दणाणून निघत असताना , राजकीय कुत्तरओढ ,संघर्ष शिगेला पोहोचल्याच्या बातम्या येत असताना, बांधकाम आणि जागांचे रेडीरेकनर दर सरकारने वाढवले आणि आज रोजच्याप्रमाणे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल मध्ये वाढ देखील झाली आहे मुंबई ,पुण्यात , अहमदनगर ,अकोला अमरावती,नांदेड ,नागपूर आख्या म्हर्ष्त्रभर डीझेलने आता शंभरी पार केली आहे . दिल्लीत डीझेल ९४ च्या खालीच आहे.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११७.६३१००.३५
अकोला११७.२६१००. ०२
अमरावती११८.६२१०१.३३
औरंगाबाद११८.९८१०१.६५
भंडारा११७.८०१००.५३
बीड११८.८४१०१.५२
बुलढाणा११७.९६१००.६९
चंद्रपूर११७.३३१००.०९
धुळे११७.६४१००.३६
गडचिरोली११८.७२१०१.४२
गोंदिया११८.८४१०१.५४
बृहन्मुंबई११७.७४१०१.९७
हिंगोली११८.३२१०१.०३
जळगाव११७.५८१००.३०
जालना११९.४५१०२.१०
कोल्हापूर११७.७११००.४५
लातूर११८.४६१०१.१५
मुंबई शहर११७.५७१०१.७९
नागपूर११७.६४१००.३८
नांदेड११९.९८१०२.६२
नंदुरबार११७.९७१००.६८
नाशिक११८.०५१००.७४
उस्मानाबाद११७.५०१००.२४
पालघर११७.८४१००.५१
परभणी११९.१०१०१.७८
पुणे११७.५९१००.३०
रायगड११७.३२१००.०२
रत्नागिरी११८.७४१०१.४१
सांगली११६.५४१००.२८
सातारा११७.८३१००.५३
सिंधुदुर्ग११८.६८१०१.३८
सोलापूर११७.७९१००.५२
ठाणे११६.९८९९.६८
वर्धा११७.७११००.४५
वाशिम११७.९११००.६४
यवतमाळ११८.३८१०१.१०

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 85-85 पैशांची वाढ झाली आहे. येथे पेट्रोलचे नवीन दर 117.57 रुपये आणि डिझेलचे नवीन दर 101.57 रुपये झाले आहेत. 12 दिवसांत इंधन तेलाच्या दरात झालेली ही 10वी वाढ आहे.

शहरवाढपेट्रोल नवी किंमतडिझेल नवी किंमत
मुंबई85-85 पैसे117.57 रुपये101.79 रुपये
दिल्ली80-80 पैसे102.61 रुपये93.87 रुपये
कोलकाता84-84 पैसे112.19 रुपये97.02 रुपये
चेन्नई76-76 पैसे108.21 रुपये108.21 रुपये

दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 102.61 रुपये आणि 93.87 रुपये प्रति लिटर (80 पैशांनी वाढ) झाले आहेत. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर 85 पैशांनी वाढून 117.57 रुपये प्रति लिटर आणि 101.79 रुपये झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 108.21 रुपये (76 पैशांनी वाढ) आणि डिझेलची किंमत 108.21 रुपये (76 पैशांनी वाढली) आहे, तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 112.19 रुपये (84 पैशांनी वाढ) आणि डिझेलची किंमत 97.02 रुपये (84 पैशांनी वाढ) झाली आहे.

तेल कंपन्या नुकसान भरपाईवर उतरल्या

1.रुसो-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत 13 वर्ष आणि 8 महिन्यांच्या उच्चांकी $ 139.13 प्रति बॅरलवर पोहोचली. 2.निवडणुकीच्या काळात कंपन्यांनी भाव वाढवले ​​नाहीत, त्यामुळे आता भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे.

किंमत 20 रुपयांपर्यंत वाढू शकते

क्रिसिल रिसर्चच्या अहवालानुसार, तेल विपणन कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 ते 20 रुपयांनी वाढवाव्या लागतील. या दृष्टिकोनातून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी 18 रुपयांनी वाढ होऊ शकते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...