दिव्यांगांसाठी एक खिडकी योजना सुरू करणार- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Date:

मुंबई, दि. 10 : दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ  महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

बोरविली पश्चिम  येथील  आर सेंट्रल  व आर नॉर्थ वॉर्ड येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, दिव्यांगासाठी  केंद्र, राज्य तसेच महापालिकेच्या विविध योजना राबविण्यात येतात अशा वेळी, नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जावे लागू नये, यासाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या हेतूने ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.

यावेळी उपस्थित  नागरिकांनी विविध विषयांवर आपले सुमारे ३६९ तक्रार अर्ज दिले. तर १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर प्रत्यक्ष समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत दि. १२ ऑक्टोबर रोजी एल वॉर्ड – कुर्ला पश्चिम येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in व बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in या लिंक वरही आपली तक्रार नोंदविता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खाजगी विमा कंपन्यांकडून दावे फेटाळण्याचे प्रमाण अन्यायकारक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; नियमन...

१३० जणांनी प्रत्येकी १.४० कोटी भरले पण बिल्डर घर देईना .. बिल्डर विरोधात प्राणत्याग आंदोलनाचा इशारा

पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर.

संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार यांची नियुक्ती मुंबई, दि. १ एप्रिल...

भाजपला मदत करणाऱ्या कॉंग्रेसच्या ७ नगरसेवकांचे निलंबन.प्रदेश कॉंग्रेस आक्रमक पवित्र्यात

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६.. कॉंग्रेसमध्ये राहून भाजपाला मदत...