पुणे दि.8 ( प्रतिनिधी ) : मालवाहतूक व विस्तारीकरणाच्या योजनेसाठी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाच्या ताब्यातील अडीच एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्त करण्यास आज संरक्षण मंत्रालयाने तत्वश: मान्यता दिली. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार या बैठकीस उपस्थित होते .या निर्णयामुळे लोहगाव विमानतळावरील मालवाहतूकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असे मानले जाते.
खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांना आज या बैठकीची माहिती दिली.ते म्हणाले की लोहगाव विमानतळावर कार्गोसेंटर नाही.त्यासाठी जागाही नाही. आपल्याला हवाई दलाच्या व प्राधिकरणाच्या अपु-या जागेवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे मालवाहतूकीवर आपोआप मर्यादा येतात. चंदिगढ येथील एका ईमारतीच्या बदल्यात लोहगाव विमानतळावरील अडीच एकर जागा विमातळ प्राधिकरणास देण्यास आज हवाईदलाने या चर्चे दरम्यान हिरवा कंदील दाखविला.चंदिगढ येथील जागा पडून आहे. ती मिळावी. अशी विचारणा हवाई दलाने केली. कारण लडाख लेह या परिसरात जवानांची नेआण करण्यासाठी. त्यांची उतरण्याची सोय करण्यासाठी ही जागा त्यांना उपयुक्त आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
बापट पुढे म्हणाले की कोरोनाच्या लसीची पुण्यात सिरम इंस्टिट्यूट मार्फत मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. ही लस देशभरात तसेच परदेशात जलदगतीने पाठविण्यासाठी लोहगाव विमानतळावर खास सुविधा निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी हवाई दलाच्या अडीच एकर जागेची तातडीने गरज असल्याच्या मुद्यावर मी भर दिला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव प्रदीपसिंह खरोळा यांना आज मी एक निवेदन दिले. भारतीय वायुसेनेच्या अडीच एकर जागेवर बांधकाम करण्यास तातडीने परवानगी द्यावी.
अशी विनंती या पत्राद्वारे मी संरक्षण मंत्रालयाला केली आहे. त्या ठिकाणच्या नियोजित टर्मिनलचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे .यासाठी ही परवानगी आवश्यक आहे .याकडे लक्ष वेधून एस्टिमेट कमिटीच्या मागील बैठकीत हा विषय चर्चेत आला होता .त्यावेळी अडीच एकर जागेवरील बांधकामाची परवानगी देण्याबाबत आपण आश्वासन दिले होते आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या विषयावर तोडगा काढण्याचे मान्य केले होते. असे या निवेदनात मी म्हटले आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून निर्माण होणाऱ्या लसीच्या वितरणासाठी विमानतळावरील सुविधा वाढविणे आवश्यक आहे. हे ही मी संरक्षण मंत्रालयाच्या आज निदर्शनास आणून दिले .
विमानतळ विस्तारासाठी संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदिल.-खा.गिरीश बापट.
Date:

