झी टॉकीजच्या चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद

Date:

विट्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती

आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करणारी पंढरीची वारी आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील सर्वव्यापी आनंद सोहळाच… हा आनंद अधिक वृद्धिगंत करण्यासाठी झी टॉकीजने विट्ठल रखुमाईची भव्य मूर्ती असलेला आकर्षक चित्ररथ वारी मार्गक्रमण करीत असलेल्या ठिकाणी नेत भाविकांना विट्ठल रखुमाईच्या अखंड दर्शनाचा लाभ उपलब्ध करून दिला. झी टॉकीजच्या या संकल्पनेला आणि चित्ररथाला भक्तांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.

पंढरपूरच्या आनंदवारी सोहळ्याची आणि विठुरायाच्या दर्शनाची अनुभूती भक्तांना सहजी मिळावी यासाठी झी  टॉकीजने केलेल्या अनोख्या कल्पनेचे भक्तांनी चांगलेच स्वागत केले. वारीच्या मार्गावरील वेगवेगळ्या शहरांतून मार्गक्रमण करणारा पंढरपूरच्या विट्ठल मंदिराच्या स्वरूपातील हा चित्ररथ आम्हाला साक्षात श्री विट्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्याची अनुभूती देत असल्याचे भक्तगण सांगतायेत. १० फुटाची ही मूर्ती प्रत्यक्ष विठुराया भेटल्याची प्रचिती देत असल्याचे सांगत सगळे भक्त या चित्ररथाला पाहून भावुक झाल्याचे पहायला मिळतायेत.

आपली संस्कृती, व्रतवैकल्ये, सणउत्सव आणि लोकरंजन यांचं खूप जवळचं नातं आहे. याच विचाराने आम्ही चित्ररथाची संकल्पना राबवली आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. गेली पाच वर्षे सातत्याने भक्ती आणि प्रबोधनाचा आगळा मेळ साधत ‘गजर कीर्तनाचा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही हा वसा जपला असल्याचे झीच्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री. बवेश जानवलेकर सांगतात.

प्रेक्षकही या कार्यक्रमाला भरभरून प्रेम देतायेत. त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांनी कार्यक्रमाप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं  आहे. वर्ध्याच्या देवळी येथील रोशनी कोपरकर सांगतात, ‘आम्ही ‘मनमंदिरा’ आणि ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा कार्यक्रम नियमित पाहत असतो. हे कार्यक्रम पाहून मनाला समाधान वाटतं आणि नवीन काही अनुभवायला मिळतं. हे कार्यक्रम असेच सुरू रहावेत. माझ्या परिवाराच्या वतीने झी टॉकीजचे यासाठी मनापासून आभार मानते. ‘मनमंदिरा’ आणि ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा कार्यक्रम आम्हाला खुप आवडतो. आम्ही दररोज घरात अगदी प्रसन्न मनाने देवाचा हरीनामाचा गजर करत या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असल्याचे थेरगाव-पिंपरी चिंचवडचे कुणाल दिलीप बारणे आवर्जून सांगतात.

रविवारी १० जुलैला असलेल्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून ह.भ.प इंदुरीकर महाराजांच्या निरूपणाचा आस्वाद ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमामध्ये दुपारी १२.०० वा. व संध्याकाळी ६.०० वा. प्रेक्षकांना घेता येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणी मोदी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको! 

पुणे-‘एपस्टीन फाईल्स’मधून समोर आलेल्या धक्कादायक व देशाला हादरवणाऱ्या खुलाशांवर...

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्जमुंबई, दि....