‘ई-कॉमर्स’ क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी

Date:

पुणे, ता. २५ जुलै : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर ‘ई र्कॉमर्स’ आणि ‘लॉजस्टिक’ क्षेत्रांचा उद्योगातील वाटा वाढत असून, या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे मत ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे (एनएसडीसी) डॉ. गणेशन यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘ई -कॉमर्स क्षेत्रातील संधी’ या विषयावर डॉ. गणेशन बोलत होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, दलित इंडस्ट्री आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, ‘एनएसडीसी’चे रमेश व्यंकट, बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गणेशन पुढे म्हणाले, ‘बीएमसीसीत एनएसडीसीच्या सहकार्याने सुरू केलेला बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हा अभ्यासक्रम ई कॉमर्स क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त आहे. या क्षेत्रातील अभ्यासक्रमासह एका वर्षाच्या नामांकित कंपनीतील अप्रेंटिसमुळे प्रात्यक्षिकांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.’

कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम महत्त्वाचे असून, त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात असे मत डॉ. करमळकर यांनी व्यक्त करून अभ्यासक्रमाला शुभेच्छा दिल्या.

व्यंकट म्हणाले, ‘ई कॉमर्स क्षेत्र वेगाने विकसित होत असून त्यात करिअर करण्यासाठी दृष्टिकोन, कौशल्य आणि या क्षेत्रातील ज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे.’

कांबळे म्हणाले, ‘भारत सरकारच्या मेक इन इंडिया, सागरमाला, रस्ते विकास, उडान अशा योजनांमुळे लॉजिस्टिक क्षेत्र विकसित होण्याला मोठे सहाय्य होत आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) या क्षेत्राचा वाटा १४.५ टक्के इतका असून, त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठी या क्षेत्राचा मौल्यवान वाटा असणार आहे.’  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

थेऊर फाट्याजवळ रासायनिक वायूगळतीचा थरार

पुणे–सोलापूर महामार्गावरील घटना; ‘मोनो मिथाईल अमाईन’च्या उग्र वासाने परिसरात...

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा-उपमुख्यमंत्री...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक

सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व...

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं...