श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन ; संतुलन संस्थेला धान्य भेट
पुणे : श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू भगवान यांच्या सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सवमूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी कार्यरत संतुलन संस्थेला देण्यात आले. याशिवाय सुवर्णकमल व रजतकमल अर्चना कार्यक्रमांतर्गत सोने व चांदींची पुष्प अर्पण करुन देवीचरणी आरोग्यसंपन्न भारताकरीता प्रार्थना करण्यात आली.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात ब्रह्मोत्सव सुरु आहे. राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत आहेत. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते.
धान्यतुला उपक्रमाचे चंदाबाई भुतडा, विशाल मेहता, विजया भुतडा, रोहित अरोरा, सुरेखा काबरा, प्रविण चोरबेले, अरुणा वट्टे, पूजा कांबळे, संगीता पोफलिया हे तर सुवर्णकमल व रजतकमल अर्चना कार्यक्रमाचे विशाल मेहता, रोहित अरोरा, प्रणाली भूमकर, ठाकू रदास बलसारा हे यजमान होते.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य वाघोली येथील संतुलन पाषाण या दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणा-या संस्थेस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अर्पण करण्यात आली.

