पुणे :- लॉकडाऊन काळात शासनाने सर्वसामान्यजनतेला अल्पदरात धान्य दिले. पण,बरीच कुटुंबं या योजनेपासून वंचित राहिले.त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अन्न सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत दत्तवाडी,नवी पेठ, राजेंद्रनगर, गणेशमळा, दांडेकर
पुल या भागातील 1221 गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.
या योजनेची जनजागृती करत शिधापत्रिका राष्ट्रवादी चे शराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नागरिकांना सरकारी योजनेची माहिती करून देत त्यांना प्रभागात सामाजिक कार्यकर्ते माजी स्वीकृत सदस्य अभिजित बारावकर यांनी राबवलेल्या उपक्रमातून याचा लाभ मिळत आहे. यावेळी बाबा धुमाळ, नितीन कदम, संतोष बेंद्रे, विपुल मैसुरकर, गजानन लोंढे, संतोष नांगरे,नितीन जाधव, दीपक जगताप, महेश हांडे,
रूपेश संत, राकेश कामठे, अजिंक्य पालकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा 1221 गरीब कुटुंबाना लाभ
Date:

