नवी दिल्ली- भरमसाठ वेगाने ऐतिहासिक विक्रम करत पेट्रोल डिझेलच्या महागाईने भारतीयांचा गळा घोटण्याचे काम सुरु केले असताना आता दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (खूपच मोठा ) दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवर 10 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून दिवाळीच्या दिवशी नवीन दर लागू होतील. आधीच देशभर शंभरी कधीच पार करून पेट्रोल डिझेलच्या दराने आपली वेगवान धाव कायम ठेवली असताना हि ५/ १० रुपयांची रोक लाऊन सरकारने जनतेची थट्टा चालविली कि काय ? असा प्रश्न आता उपस्थित होणार आहे. दरम्यान व्यावसायिक गैस सिलेंडर चे दर २००० रुपये झाल्याने चहावालेही आता संतापले आहेत . देशभरातील चहावाले एकत्रित येऊन संघटना स्थापन करावी असे सल्ले त्यांना देण्यात आले तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.
सरकारी थट्टा- लावी मतदाराला बट्टा ; पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात
Date:

