पुणे- नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली 103 सोसायट्यांच्या पानशेत पुरग्रस्त विकास शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि 21/3/22 च्या पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांना जमिनी मालकीहक्काने देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढून लोकहिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली
शिष्टमंडळाच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी उद्याच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. यामध्ये मालमत्ता पत्रका वरील क्षेत्रफळाची चुकीची नोंद दुरुस्त करणे बाबत,कोर्ट केसेस असणाऱ्या सभासदांचे प्रश्न, वाणिज्य वापरा बाबतचे वर्गीकरण व इतर येणाऱ्या अडचणींबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करणे बाबत बैठक करीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी .गरसेविका अश्विनी कदम यांच्या समवेत नितीन कदम व पानशेत पुरग्रस्त विकास मंडळाचे पदाधिकारी शशिकांत बडदरे, गजानन भंडारे, विजय पाबळे,एम.व्ही.जोशी, कणस्कर, प्रविण खत्री, राजेश राजपूत, शिरीष शहा, उमेश जाधव इत्यादी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी यांना पेढे देऊन शासनाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले.

