पुणे-सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी कुशल चालक निर्माण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी परिपूर्ण व सुसज्ज राहावे असे आवाहन माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी येथे केले.
सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व प्रशिक्षकांना साठी सी आय आरटी पुणे सर्टिफिकेट वितरण कार्यक्रम माजी सनदी अधिकारी माजी परिवहन आयुक्त माजी मुख्य सचिव महेश झगडे यांच्या हस्ते व डॉ. कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील (संचालक सी आय आरटी पुणे) शेखर ढोले (रस्ता सुरक्षा विषयक प्रमुख सी आय आर टी पुणे) संजय ससाणे (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे )प्रशांत काकडे (ट्रेनिंग विभाग प्रमुख सी आय आर टी पुणे) राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार कार्याध्यक्ष सुनिता चौहान उपाध्यक्ष अनंत कुंभार प्रवीण महांकाळ तुकाराम चव्हाण सचिव शिवाजी काकडे माजिद शेख भारती निलेश पाटील अध्यक्ष वसई विरार विवेक खाडे अध्यक्ष पनवेल व प्रवक्ते महाराष्ट्र राज्य उदय राज देसाई सुनील मोरे दीपक कस्तुरे दीपक रावल सर्व कोल्हापूर विभाग मिलिंद बैसाने धुळे नंदुरबार विभाग शेख मन्सूर उपाध्यक्ष बीड आदी पदाधिकारी उपस्थित होते
राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने आत्तापर्यंत 300 ड्रायव्हिंग स्कूल मालक व प्रशिक्षकांनी हा सर्टिफिकेट कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे सदर कोर्समध्ये अनिल पंतोजी डॉ सुनील धापटे शेखर ढोले प्रशांत काकडे संजय ससाणे लोकमान्य हॉस्पिटल चे डॉ. अभिषेक श्रीखंडे दीपक कानडे या मान्यवर व्याख्यात्यांने तीन दिवस निवासी प्रशिक्षण रस्ता सुरक्षा कार्यक्रमात मार्गदर्शन केले
जगभर होत असलेली स्थित्यंतरे व ज्या वेगाने आधुनिक तंत्रज्ञानात होत असलेले बदल याला सामोरे जाण्यासाठी सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी सज्ज होऊन आधुनिक पद्धतीने प्रशिक्षणात बदल करून कुशल वाहन चालक निर्माण करण्यासाठी त्यासाठी आवश्यक ते बदल आपल्या प्रशिक्षणात करावे व वाहतुकीच्या कायदा व कलमे याची माहिती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यां पर्यंत पोचवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश करावा व रस्ते अपघात कमी करण्यासाठी व कुशल वाहनचालक निर्माण करण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूल ने शाळा व कॉलेज यांच्याबरोबर संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिर आयोजित करावीत असे प्रतिपादन महेश झगडे यांनी केले व सर्व ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला
आज अस्तित्वात असलेली ड्रायव्हिंग स्कूल यांनी अपग्रेड व्हावे व अधिकाधिक अद्ययावत सुविधा उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात व आधुनिक तंत्रज्ञानाचा नुसार नवीन नवीन वाहने प्रशिक्षणासाठी वापरावी व उत्कृष्ट प्रशिक्षण उमेदवारांना द्यावे सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल यांचे परीक्षण होऊन त्यांना दर्जानुसार ग्रेडेशन व परीक्षण परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य व सी आय आर टी पुणे वतीने भविष्यात होणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी सज्ज राहावे असे प्रतिपादन डॉ कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील संचालक सी आय आरटी पुणे यांनी सदर प्रसंगी केले
ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी इंडस्ट्रियल व्हिजिट ऑटोमोबाईल शोरूम ला उमेदवारांसह भेटी व ड्रायव्हिंग स्कूल व महाविद्यालय यांच्याबरोबर संयुक्त विद्यमाने कॉलेज विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा चे महत्व व वाहतुकीच्या नियमांची विस्तृत माहिती अशा प्रकारचे उपक्रम राबून वाहन चालकाला परिपूर्ण माहिती प्रतिपादन करावी यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन संजय ससाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी सदर प्रसंगी केले
रस्ते अपघातात मरण पावणार्या वाहनचालकांची संख्या लक्षात घेता वाहना बद्दलची पुरेशी माहिती तंत्रज्ञानाचे पुरेशी माहिती न घेता वाहतुकीच्या कायदा कलमाची माहिती न घेता 18 ते 33 वयोगटातील तरुण पिढी रस्ते अपघातात आपण गमावत आहोत यासाठी प्रत्येक लायसन्स मोटार ड्रायव्हिंग स्कूल मधूनच अनिवार्य करावे म्हणजे वाहनाची माहिती वाहतुकीच्या नियमांची माहिती घेऊनच प्रशिक्षित वाहनचालक रस्त्यावर येईल रस्ते अपघातात मरण पावणार्या वाहनचालकांच्या संख्येत त्यामुळे निश्चितच कमी येईल म्हणूनच प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्स सरकार मान्य मोटर स्कूल मधूनच अनिवार्य करावे ही मागणी रस्ते व महामार्ग विभाग भारत सरकार यांनी मान्य करावी अशी मागणी राजू घाटोळे अध्यक्ष राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन यांनी सदर प्रसंगी केलेतसेच सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल संचालकांची राज्याबाहेरील संचालकांचे पहिली तुकडी यांचे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येईल यात किमान 50 राज्याबाहेरील ड्रायव्हिंग स्कूल संचालक सहभागी होतील असे राजू घाटोळे म्हणाले
प्रास्ताविक प्रशांत काकडे यांनी केले व आभार प्रदर्शन माने सर सी आय आर टी पुणे यांनी केले