चांगली कविता माणसाला खेचूनच घेते : कवी वैभव जोशी.

Date:

पुणे-

“अनेक प्रश्न या पिढीसमोर आहेत. सध्याच्या काळाचं प्रतिबिंब या कवितांमधून वाचायला मिळतं, त्यामुळे चांगली कविता माणसाला खेचूनच घेते.” असे उद्गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले. तनया गाडगीळ लिखित ‘विवश’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. “संपूर्ण पुस्तक वाचत असताना विचारांमधील प्रगल्भता अचंबित करणारी आहे. कॅलिडोस्कोप सारखी या काव्यसंग्रहातील कविता परत परत वाचताना दरवेळी वेगळं काहीतरी दाखवते. विचारांमधला ठामपणा, प्रामाणिकपणा, अंधाराची स्वीकृती या कवितांमधून जाणवते. अलीकडच्या काळातलं वाचलेलं हे चांगलं पुस्तक आहे आणि म्हणूनच ही कविता नक्की टिकेल असं मला वाटतं.” असेही मत वैभव जोशी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कवयित्री तनया गाडगीळ याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “नकारात्मक भावनांनाही एक मानाचे स्थान असावे. घटना आणि भावनांची कोंडी होते त्यावेळी जाणवतं की आपण अनेक वेळा हतबल असतो. अश्रू आणि विचारांचा गुंता यातूनच जन्माला आली आहे ही कविता.”
तारांगण प्रकाशनातर्फे विवश हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. तारांगण प्रकाशनाचे मंदार जोशी याप्रसंगी बोलताना म्हणाले, “उत्तम कवयित्रीचं पहिलं लक्षण म्हणजे भावनाशील असणं. चांगल्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये या काव्यसंग्रहात अनुभवायला मिळतात.”
विवश या कवितासंग्रहाच्या छोटेखानी प्रकाशन समारंभास रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि संवाद पुणे चे सुनील महाजन उपस्थित होते. प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रोहन गाडगीळ यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...