पुणे-सावरकर पुण्यतिथीनिमित्त अखिल बृम्हण मध्यवर्ती संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या स्वा. सावरकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेत जाधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेमध्ये विविध शाळांमधील १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी छोटा गट व मोठा गट यामध्ये एकूण ६ विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळविले. वरीष्ठ पोलिस निरीक्षक माननीय श्री. प्रसाद हसबनीस यांच्या हस्ते सृजा घाणेकर, जान्हवी कुलकर्णी, तेजस साने, पूर्वेश देवकर, ईशा महल्ले, बेरवा भणगे या विद्याथर्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला डी.इ.एस शाळेच्या मुख्यध्यापीका मा. श्री. सुजाता नायडू, केंद्रप्रमुख श्री. प्रकाश दाते, कार्यवाह विश्वनाथ भालेराव तसेच मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. विकास दिग्रसकर उपस्थित होते.