नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या फैलावात गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायाचा कल सोन्याकडे कायम आहे. यामुळे सोने दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी ७७३ रुपये वाढीसह ४५,३४३ रु. प्रती १० ग्रॅमवर पोहोचले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यावसायिक सत्रात सोने ४४,५७० रु. प्रती १० ग्रॅमवर बंद झाले होते.

