एका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता

Date:

नवी दिल्ली,: जगभरातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आर्थिक रिकव्हरीचे (Economy Recovery Hopes) संकेत मिळत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढत आहे. शुक्रवारी कॉमेक्सवर सोन्याची किंमत 1 टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते सोन्याचे दर (Gold Price) घसरून 1941 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. जगभरातील मोठ्या रेटिंग एजन्सींच्या मते पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येईल, अशी शक्यता कमी आहे.

सिटी ग्रृपने त्यांच्या आताच्या अहवालात असे म्हटले आहे की, सोन्यामध्ये तेजीची शक्यता 30 टक्के तर घसरणीची शक्यता 20 टक्के आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जर तेजी आली तर सोन्याचे दर 2275 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात, घसरण झाल्यास सोन्याचे दर 1600 डॉलर प्रति औंसपर्यंत येण्याची शक्यता आहे.

एका महिन्यात 4000 रुपयांनी स्वस्त झाले सोने

देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किंमती घसरत आहेत. रुपयाचे वधारलेले मुल्य हे या मागचे मुख्य कारण सांगण्यात येत आहे. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर होते, तर आता देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 52 हजारांच्या खाली आहे.

सलग 4 दिवस सोन्याचे भाव वाढल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे भाव कमी झाले होते. दिल्लीतील सराफा बाजारात देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या सोन्याच्या किंमतीचा परिणाम पाहायला मिळाला. याठिकाणी सोन्याचे दर 52,643 रुपये प्रति तोळावरून कमी होत 52,452 रुपये प्रति तोळावर आले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात 191 रुपये प्रति तोळाची घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी एक किलोग्रॅम चांदीची किंमत 70,431 रुपयांवरून 69,950 रुपये प्रति किलो झाली होती. चांदीमध्ये 990 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...