सोने स्वस्त, मोबाईल महाग …

Date:

  • केंद्रीय अर्थसंकल्पातील विशेष बाबी….
  • सोने-चांदी होणार स्वस्त. सोन्या-चांदीवरील सीमा शुल्कामध्ये घट. १ ऑक्टोबरपासून नवीन सीमा शुल्क धोरण लागू होणार.
  • मोबाईल फोन महागणार. मोबाईलच्या काही उपकरणावरील सीमा शुल्क २.५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. तर तांबे आणि स्टीलच्या करात कपात करण्यात आली आहे.
  • टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर. गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय.
  • अनिवासीय भारतीयांना कर भरण्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी त्यांना डबल कर प्रणालीमधून सूट देण्यात येणार. स्टार्ट अप उद्योगांना करामधून देण्यात आलेली सूट ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावे लागतील पण रिटर्न फाईल करण्याची गरज नाही. याचा लाभ केवळ पेन्शनधारकांसाठी असणार आहे.
  • वित्तीय तूट ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यासाठी सरकारला ८० हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. हे पुढील दोन महिन्यात मार्केटमधून घेण्यात येईल.
  • डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र सरकराने १५०० कोटींची तरतूद केली जाणार
  • गोवामुक्तीला ६० वर्षपूर्तीनिमित्त ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार
  • आगामी जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार. यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार
  • न्यू इंडिया स्पेस लिमिटेड यंदा PSLV-CS51 लॉन्च करेल. याशिवाय गगनयान मिशनअंतर्गत मानवरहित पहिला उपग्रह डिसेंबर महिन्यात लॉन्च होईल. ईज़ ऑफ डूइंग बिजनेसअंतर्गत एक ट्रिब्युनलची निमिर्ती करण्यात येईल. यामध्ये कंपनीमधील वादाचे लवकर निराकरण करण्यात येईल.

– अनुसूचित जातीच्या ४ कोटी विद्यार्थ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद.

  • देशभरात जवळपास १०० नवे सैनिकी शाळा बनविण्यात येणार. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनविण्यात येणार.
  • प्रवासी मजुरांसाठी देशभरात एक देश-एक रेशन योजना सुरु. यासाठी एक पोर्टल सुरु केले जाईल, ज्यात स्थलांतरित मजुरांची माहिती असेल.
  • शेतकऱ्यांना किमान हमीभावासाठी आकडा ७५ हजार कोटी रुपये. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय
  • स्वामित्व योजना देशभरात लागू. तसेच, ऑपरेशन ग्रीन स्कीमचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये अनेक पिकांचा समावेश करण्यात येणार असून याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी क्षेत्रातील क्रेडिट टार्गेट 16 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात येणार. पाच फिशिंग हार्बर हब म्हणून तयार केले जाणार आहेत. तामिळनाडूमध्ये फिश लॅण्डिंग सेंटर विकसित केलं जाईल.
  • शेतकऱ्यांसाठी निधी वाढवला. शेतमालाला दीडपट भाव देण्याचे उद्दिष्ट. धानसाठी १ लाख ७२ हजार कोटी देणार. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीची तरतूद. बियाणांसाठी १०, ५४० हजार कोटींची गुंतवणूक. डाळ, गहू, धानसहित अन्य पिकांची MSP वाढविण्यात आली आहे.
  • सरकारी बँका सक्षम करणार. २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची तरतूद. यावर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार. डीव्हीडेंटवर टीडीएस बसणार नाही.
  • बँकांच्या बुडीत कर्जावर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. बँकांच्या बुडीत कर्जे वेगळ्य़ा कंपनीत वळविणार आहेत; बुडीत कर्जांची वसुली करणार असल्याचेही स्पष्ट

– विमा कायद्यात सुधारणा. विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७२ टक्के करणार.

  • सार्वजनिक वाहतुकीमधील बसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी रुपये. नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद.
  • ऊर्जा खात्यासाठी ३ लाख कोटी रुपयांची योजना सुरु केली जात आहे. तसेच सरकारकडून हाइड्रोजन प्लांटसाठी बनवण्याची घोषणा. ऊर्जा खात्यातील पीपीपी अंतर्गत अनेक प्रोजेक्ट पूर्ण केले जातील. ग्राहकांना पसंतीनुसार वीज जोडणी. सौरऊर्जेसाठी १ हजार कोटीची तरतूद.
  • रेल्वेसाठी१.१० कोटी रुपयांची तरतूद. राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार.
  • जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद.
  • देशातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणार.
  • भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद. रस्ते, महामार्गांची भरीव तरतूद. मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमी कॉरिडॉर बनविणार. तसेच, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाममध्येही इकॉनॉमी कॉरिडॉरची घोषणा.
  • करोना पतिबंधक लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा. आरोग्य क्षेत्राचे बजेट १३७ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. दोन मोबाईल हॉस्पिटलची घोषणा.१७ नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार. ३२ विमानतळांवरही असणार. ९ बायोलॅब, चार नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी बांधणार.
  • आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा. यासाठी ६४ हजार कोटींची तरतूद.
  • जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ लवकरच लागू करणार. वाहने भंगारात काढणे ऐच्छिक असेल.
  • ११२ जिल्ह्यांमध्ये स्वच्छ योजना राहील. आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधांमध्ये भरीव तरतूद करणार. ७ नवे टेक्स्टाईल्स पार्क उभे करणार
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर देणार.
  • निर्मला सीतारामन यांच्याकडून करोना काळातील मदतीची माहिती. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत २७.१ लाख कोटी रुपयनची मदत दिली. हे सर्व पाच मिनी अर्थसंकल्पासारखे होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...