पुणे: महिला आज आपल्या विचारांच्या ही पलीकडील क्षेत्रात जाऊन व्यवसाय आणि उद्योग करीत आहेत. आणि आपल्या कामाला त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जात आहेत याचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अनेक अशक्यप्राय गोष्टी महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर सिद्ध केल्या आहेत. असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघटना यांच्यावतीने महाराष्ट्रातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या महिला उद्योजकांचा वंदना चव्हाण यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य व्यावसायिक पुरस्कार २०२१’ देऊन सन्मान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृणाल वाणी आणि संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती रामाने, सचिव अनिता डफळ आणि मान्यवर उपस्थित होते.
राजलक्ष्मी जेधे, सुजाता दहाड, श्वेता उंड्रे, स्नेहल निम्हण, चैताली बारडिया, श्रद्धा पाटील-थोरात, ज्योत्स्ना कलाटे, मेरी जयस्वाल, अपूर्वा गुरावे, श्रद्धा दराडे, सुनीता पाटसकर, प्रीती मोरे, अनिता डफळ, कीर्ती मोटे, स्मिता वाकडकर, सीमा खंडाळे, विजया मानमोडे, सीमा हिमाने, विनया तापकीर, श्वेता कापसे, तृप्ती निंबळे यांना या वेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती धनवटे-रामाने यांनी केले.

