आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईसाठी गोगावलेंची याचिका

Date:

मुंबई-भाजप-शिंदेसेना सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षादेश (व्हीप) मोडून विरोधी बाजूने मतदान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका शिंदे गटाचे शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी अध्यक्षांकडे केली आहे. यामध्ये अजय चौधरी, सुनील प्रभू, डॉ. राहुल पाटील यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. मात्र, एकनाथ शिंदे गटाने मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली. रविवारी (३ जुलै) गोगावले यांनी अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यानुसार विधिमंडळ सचिवालयाने पत्र काढून अजय चौधरी यांना गटनेते तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोदपदावरून हटवले. त्यानंतर सोमवारी याविरोधात सेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र, कोर्टाने आता सर्व सुनावणी ११ जुलै रोजीच होईल, असे सांगितले. त्यामुळे सेनेच्या गोटात निराशा पसरली.

१६ आमदारांबाबत पुढे काय

सोमवारी गोगावलेंनी १६ आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. अध्यक्ष आता आदित्य ठाकरेंसह संबंधित आमदारांना नोटीस बजावतील. त्यानंतर व्हीप झुगारणाऱ्या आमदारांचे अध्यक्ष म्हणणे ऐकून घेतील. व्हीप मोडल्याचे अध्यक्षांना वाटल्यास ते पुढे आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे ११ आमदार राहिले गैरहजर
१.प्रणिती शिंदे २. अशोक चव्हाण ३. विजय वडेट्टीवार ४. धीरज देशमुख ५. कुणाल पाटील ६. राजू आवळे ७. मोहन हंबर्डे ८. शिरीष चौधरी ९.जितेश अंतापूरकर १० झिशान सिद्दिकी ११. माधवराव जवळगावकर हे काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. यातील प्रणिती शिंदे या परदेशात असून जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने त्यांनी गैरहजर राहण्याची परवानगी मागितली होती.

छोट्या पक्षांसह १९ जण सरकारच्या बाजूने

बविआ ३, प्रहार २, मनसे १, शेकाप १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य १ आणि १० अपक्ष हे आमदार सरकारच्या मागे उभे राहिले. माकप १, शेतकरी क्रांतिकारी पक्ष १ आणि देवेंद्र भुयार व संजय शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले. भाजपच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे गैरहजर होते. अनेक आमदार ११ वाजेपर्यंत सभागृहात पोहोचले नाहीत. शिरगणती होईपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद करतात.

कालपर्यंत ठाकरेंसाठी रडणारे संतोष बांगर आज शिंदे गटात
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी रविवारी (३ जुलै) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी बाजूने मतदान केले होते. रविवारपर्यंत बांगर हे आपण अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगत होते. हिंगोलीत रॅली काढत त्यांनी कार्यकर्त्यांना रडत भावनिक आवाहनही केले होते. सोमवारी ते एकनाथ शिंदेंसह सभागृहात पोहोचल्याने त्यांची आता संख्या ४० झालीय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...

पत्रकार विक्रांत आढाव यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विक्रांत आढाव...