गोदरेज इंटरिओने ठेवले रु. ३०० कोटींची कमाई करण्याचे उद्दिष्ट

Date:

मुंबई, २२ मार्च २०२२: गोदरेज ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसतर्फे आज अशी घोषणा करण्यात आली की, घर आणि संस्थात्मक विभागांमधील भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेल्या गोदरेज इंटेरिओने स्वतःचा पायाभूत सुविधा व्यवसाय अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून पुढील आर्थिक वर्षात रू. ३०० कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत एकूण बाजारपेठेतील १५% हिस्सा प्राप्त करण्याची ब्रँडची योजना आहे.

वर्ष २०१९ पासून आजवर ब्रँडने या आधीच रू. ४५० कोटी किमतीचे पायाभूत सुविधा प्रकल्प (इन्फ्रा प्रोजेक्ट्स) पटकावलेले आहेत. पायाभूत प्रकल्पांतगर्त कामाच्या सर्वसामान्य आवाक्यामध्ये सिव्हिल फिनिश, क्लॅडिंग, ब्लॉक वर्क, दर्शनी भाग ग्लेझिंग, अंतर्गत सजावट (इंटिरियर), आर्ट फॉर्म आणि आर्किटेक्चरल फिनिश इत्यादी कामांचा समावेश होतो. गोदरेज इंटेरिओ या बाबत कामाच्या संकल्पनेपासून ते प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत संपूर्ण एंड-टू-एंड सोल्यूशन्स प्रदान करून आपल्या इन्फ्रा आर्मद्वारे बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहून काम करत आहे. कंपनीच्या अनुभवी ‘स्पेस प्लॅनिंग प्रोफेशनल्स’च्या टीममध्ये वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांचा समावेश आहे, ज्यायोगे ग्राहकांना एक संपूर्ण समन्वित व अखंडित अनुभूती मिळते. सामान्य करारांच्या जोडीलाच गोदरेज इंटेरिओ सिव्हिल आणि इंटीरियर कामाचे डिझाईन आणि अंमलबजावणी, एमईपी यंत्रणा, सुरक्षा आणि निगराणी (देखरेख) ठेवणे, हरित सल्लासेवा (ग्रीन कन्सल्टन्सी) आणि दृकश्राव्य उपकरणे (ऑडिओ-व्हिज्युअल सोल्यूशन्स) यांचा पुरवठा करते.

गोदरेज इंटेरिओचे मुख्य कामकाज अधिकारी (सीओओ) अनिल सैन माथूर म्हणाले: “भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्प हे नेहमीच आमच्यासाठी प्राधान्याचे क्षेत्र राहिलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे, की सध्या अंदाजे ५००० कोटी रुपयांच्या आसपास मूल्य असलेल्या या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आणखी वाढीची क्षमता नक्कीच सामावलेली आहे. सध्या, आमच्या पूर्णतः व्यावसायिक अशा (बी२बी) प्रकल्पांच्या एकूण उलाढालीमध्ये आमच्या प्रमुख (टर्न की) प्रकल्पांचे ४०% टक्क्यांपर्यंतचे योगदान आहे. आमची ही टर्न की सोल्यूशन्स वितरीत करण्यात आम्ही अग्रेसर असून संपूर्ण देशभरात एक मजबूत सार्वजनिक वाहतूकीचे जाळे निर्माण करण्याच्या भारताच्या ध्येयदृष्टीकोनात सक्रीयपणे सहभागी होऊन आम्ही प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान करण्यासाठी संबंधित मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि विमानतळ प्राधिकरणांसोबत जवळीकीने काम करत आहोत. आम्हाला खात्री आहे की आमचे हे नाविन्यपूर्ण डिझाइन सोल्यूशन्स आमच्या भागीदारांना, मेट्रो प्रकल्पांना खूप सहाय्यभूत ठरतील आणि उत्तम दृश्यमानता व कार्यक्षमता या दोन्ही बाबतीत सर्वोच्च मानकांची पूर्तता करतील.”

गोदरेज इंटेरिओ आपल्या चालू कामकाज प्रकल्पांमध्ये मूल्यवर्धित आरेखन प्रदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या आगळ्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत आहे. ट्रिपल ए आय (AAI) – चेन्नई प्रकल्पात वापरल्या जाणार्‍या काही नवीन सामग्रीमध्ये इटलीमधून आयात केलेले झिंक कंपोझिट पॅनल्स आणि एचपीएल, लॅक्क्वर्ड ग्लास यांच्यासारख्या उच्च श्रेणीतील फिनिशचा समावेश करण्यात आलेला आहे.

गोदरेज इंटेरिओने यापूर्वीच कोलकाता, बेंगळुरू, मुंबई आणि कोचीसह देशभरातील चार मेट्रो रेल्वे प्रकल्पांसोबत भागीदारी केलेली आहे. जगाच्या अनेक भागांतील मेट्रो स्थानके शहराची संस्कृती प्रतिबिंबित करत असल्याने, ग्राहकांच्या विनंतीनुसार गोदरेज इंटेरिओने आपल्या मेट्रो प्रकल्पांमध्ये त्या त्या शहराची संस्कृती परावर्तीत करणारी सजावट निर्माण करण्यासाठी सहाय्य केलेले आहे. उदा. कोची मेट्रो रेल लिमिटेड (KMRL) चे दोन उन्नत (ओव्हरहेड) मेट्रो स्टेशन प्रकल्प आहेत. कोची मेट्रोमध्ये प्रत्येक स्थानकाची एक विशिष्ट मध्यवर्ती संकल्पना (थीम) ठेवण्यात आलेली आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेड (KMRL) ने सर्व स्थानिक घटक आणि केरळ किंवा देशभरात विविध क्षेत्रात केलेले योगदान लक्षात घेऊन ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित केली आहे. केरळ आणि भारताच्या इतिहासात आयुर्वेदिक औषधांचे उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन पहिले स्थानक ‘आयुर्वेद’ या थीमवर आधारित विकसित केले गेले होते; तर भारत यंदा २०२२मध्ये आपला ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असल्याने दुसऱ्या मेट्रो स्थानकाची थीम देशाला गौरव आदरांजली देणारी अशी निश्चित करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...