पुणे – समाजात सगळंच वाईट घडत आहे असे अनेक जण कायम सांगत असतात. पण त्यातून समाजात
घडणा-या सकारात्मक गोष्टी समाजापुढे आणून त्यांना पुरस्काराचे बळ देण्याचा माननीय कृष्णकांत कुदळेयांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोदगार अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालक गिरीषबापट यांनी आज येथे काढले.
कृष्णकांत कुदळे फाऊंडेशन, कृष्णकांत कुदळे नागरी पतसंस्था आणि नर्सिग दत्त महिला पतसंस्थेच्यावतीनेआयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात बापट बोलत होते. माजी ग्रामविकास मंत्री जयंतपाटील, कृष्णकांत कुदळे, मंगला कुदळे, मोहन टिल्लू, प्रा. एम.एम. फुले, ऍड. ज्योत्स्ना बानपेल, श्वेता नारके,रविंद्र दुर्वे, प्रा. दादा शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दरवर्षी हा पुरस्कार वितरणाचाकार्यक्रम कृष्णकांत कुदळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होतो पण यंदा हा कार्यक्रम अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावरकरण्यात आला आणि सर्वांनी “ सुदिनम्..सुदिनम्…” हा संस्कृत श्लोक म्हणून कृष्णकांत कुदळे यांना अक्षय्यआरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार सहकार महर्षि काकासाहेब थोरात नागरी पतसंस्था, शंतनूराव किर्लोस्करपुरस्कार रूबी हॉलचे डॉ. परवीझ ग्रांट, सुनील दत्त पुरस्कार ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर तर उदयोन्मुखकलाकार अभिनेत्री अनुजा साठे हिला नर्गिस दत्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुक्ता मनोहर यांनी त्यांनामिळालेल्या पुरस्काराची रक्कम ए. डी. भोसले प्रतिष्ठानला पालकमंत्री बापट यांच्या हस्ते सुपूर्त केली.
पालकमंत्री बापट म्हणाले, पुणेकरांचे पुणेरीपण अनुभवण्यासाठी पुण्यातच रहावे लागते कारण आज पुण्यातरोज इतके विविध कार्यक्रम कार्यकर्ते घेत असतात. कृष्णकांत कुदळे यांनी असाच हा पुरस्काराचा कार्यक्रम गेलीकाही वर्षे सातत्याने आयोजित करून पुण्यातील सांस्कृतिक वातावरण जपले आहे. ते अशा कार्यक्रमातूनचसमाजातील सकारात्मक गोष्टी समाजासमोर आणत आहेत. ही सकारात्मक उर्जा समाजात पसरिवण्यासाठीभाउंना दीर्घायुष्य लाभो.
जयंत पाटील म्हणाले, काही दिवसांपूर्वी मुंबईला जाताना पुण्यात साहेबांच्या बरोबर उतरलो आणि थेट रूबीहॉलमध्ये कुदळे यांना भेटायला गेलो. त्या दिवशी भाऊंनी खूप गप्पा मारल्या. आणि आज रूबी हॉलला जोपुरस्कार दिला गेलाय तो किती योग्य आहे व्यासपीठावर बसलेल्या भाऊंच्याकडे बघून पटते. त्यांचा खाजगीसाखर कारखाना चालतो कसा हे बघण्यासाठी मी काही वर्षांपूर्वी त्यांच्या कारखान्यावर गेलो होतो. उत्तमदर्जाचे व्यवस्थापन काय असते हे मी तिथे बघितले. अशा व्यवस्थापनाची सवय असलेल्या भाऊंचा वाढदिवस३० एप्रिल ऐवजी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे. त्यांना पुढे असेच काम करण्यासाठी अक्षय्यआरोग्य लाभण्यासाठीच हा योगायोग घडून आला आहे.
यावेळी सर्व पुरस्कार विजेत्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात शुभांगी मुळे यांच्य सुरेलस्वरांनी झाली. त्यांनी नर्गिस दत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात या प्रसंगीआपल्या शुभेच्या देण्यासाठी आलेल्यांना धन्यवाद देऊन कृष्णकांत कुदळे म्हणाले की, पतंसंस्थाच्या माध्यमातूनक्षेत्रात चांगले काम सातत्याने करणा-यांचे काम समाजापुढे आणण्याचा हा उपक्रम आहे. यांनी केले तर आभार मोहन टिल्लू यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनया देसाई यांनी केले.

