शनिवार ११ जून २०१६ रोजी मयुर कॉलनी, कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये गायत्री सप्रे – ढवळे व अपर्णा पणशीकर ह्या बहिणी आपली कला सादर करणार आहेत .
आत्मिना म्हणजे स्मरण/ स्मृती/ आठवण.
काही जुन्या आणि काही नवीन रचना ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळतील.
वेगवेगळ्या संगीत परंपरांमध्ये गायनाचे शिक्षण घेतलेल्या ह्या दोघी, आपापली स्वतंत्र ओळख कायम ठेवत, शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय प्रकारांमधील, ठुमरी, दादरा, कजरी, झुला आणि संत मीराबाई व सूरदास यांची भजने पेश करतील.
गायत्रीने आपले शास्त्रीय संगीताचे शिक्षण सौ. मीरा पणशीकर, डॉ. सौ. शोभा अभ्यंकर यांच्याकडून घेतले. सध्या पं. संजीव अभ्यंकर यांच्याकडे व उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण डॉ. शशिकला शिरगोपीकर यांच्याकडून घेत आहे.
अपर्णाने कै. पं. भास्करबुवा जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर परंपरेतील तालीम घेतली व मातोश्री सौ. मीरा पणशीकर यांच्याकडे जयपूर परंपरेची तालीम सुरु आहे.
पद्मभूषण पं. छन्नुलाल मिश्रा यांच्याकडे उपशास्त्रीय प्रकारांचे शिक्षण घेतले.
साथ संगत पुढीलप्रमाणे :
तबला : हणमंत फडतरे
संवादिनी : कुमार करंदीकर व सुरेश फडतरे
पखवाज : पद्माकर गुजर
निवेदन : नीरजा आपटे
हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता आहे आणि सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.