Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गौतम अदानी एलन मस्कला मागे टाकू शकतात

Date:

नवी दिल्ली : जगातील सर्वात मौल्यवान वाहन कंपनी, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना ७५ हजार कोटींहून अधिक रुपये स्वाहा झाले आहे. टेस्लाचे शेअर्स गेल्या अनेक दिवसांपासून घसरत आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही हाच ट्रेडिंग कायम राहिला. मंगळवारी कंपनीचे समभाग १२ टक्क्यांहून अधिक घसरल्यामुळे मस्कची संपत्ती एका झटक्यात ९.०९ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ७५ हजार कोटी रुपयांनी घटली आहे.दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी मस्क यांना मागे टाकून श्रीमंतांच्या यादीत दुसरा क्रमांक काबीज करू शकतात. मंगळवारी अदानीच्या एकूण संपत्तीत १.६१ अब्ज डॉलर इतकी घट झाली. आणि सध्या ते ११९ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मस्क आणि अदानी यांच्या संपत्तीत आता फक्त नऊ अब्ज डॉलर्सचा फरक राहिला आहे. गेल्या वर्षी अदानींच्या संपत्तीत ४४ बिलियन डॉलरची भर पडली तर मस्कण २०० बिलियन डॉलरचा फटका बसला. अदानी गेल्या वर्षीही या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. जगातील मनाच्या व्यक्तींमध्ये हे स्थान मिळवणारे ते आशियातील पहिला अब्जाधीश होते.ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्कची एकूण संपत्ती आता १२८ अब्ज डॉलरवर घसरली आहे. मस्क सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण लवकरच ते तिसऱ्या क्रमांकावर सरकण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये मस्कची एकूण संपत्ती ३४० अब्ज डॉलर इतकी होती परंतु गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांच्या नेटवर्थमध्ये सातत्याने घसरली झाली आणि त्यांना एकूण २०० अब्ज डॉलरहून अधिकचा फटका सहन करावा लागला. दरम्यान, एवढी प्रचंड संपत्ती गमावणारे मस्क जगातील पहिलेच व्यक्ती आहे. टेस्लाच्या समभागांची घसरण हे मस्कच्या निव्वळ संपत्तीच्या घसरणीमागचे सर्वात मोठे कारण आहे. टेस्लाचे शेअर्स गेल्या वर्षी ६५ टक्क्यांनी घसरले. कंपनीने वाढीचे लक्ष्य चुकवले आणि चीनमधील उत्पादनातही कपात केली आहे. कंपनीने सोमवारी चौथ्या तिमाहीत त्याच्या वितरणाची नोंद केली, जी बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी झाली.जगभरात टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाडीची मागणी सातत्याने कमी होत असून त्याला इतर कंपन्यांकडूनही कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात, कंपनीने आपली इन्व्हेंटरी साफ करण्यासाठी विक्रीची घोषणा केली होती. यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आणि डिसेंबरमध्ये कंपनीचा शेअर ३७ टक्क्यांनी कोसळला. त्यांनतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर खरेदीचा ४४ अब्ज करार देखील टेस्लाला महागात पडला. मस्क टेस्लाचे सर्वात मोठा भागधारक असून गेल्या एप्रिलपासून त्यांनी टेस्लाचे २३ अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकले आहेत. एकेकाळी टेस्लाचे मार्केट कॅप १ ट्रिलियन होते परंतु गेल्या वर्षाच्या शेवटी ते ३८६ अब्ज डॉलरपर्यंत घसरले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...