
‘सेल्फी विथ गाडगेमहाराज’ला मोठा प्रतिसाद
पुणे, कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने सादर केलेल्या ‘माझं पुणे, स्वच्छ पुणे’, ‘सेल्फी विथ गाडगेमहाराज’ या देखाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कचरा कसा निर्माण होतो, त्यामुळे उद्भवणार्या समस्या, कचर्याचे प्रकार, त्याच्या वर्गीकरणाची गरज, तो वेगळा ठेवण्याच्या पध्दती, सफाई कर्मचार्यांचे काम, स्वयंसेवी संस्थांच्या भूमिका, कचर्यापासून खत, बायोगॅस, वीजनिर्मिती, महापालिकेच्या सवलती, प्लॅस्टिक व ई-कचर्याचे व्यवस्थापन, जनजागृतीची आवश्यकता या विषयांचा दहा मिनिटांच्या जिवंत देखाव्यात समावेश आहे. तीन मिनिटांच्या चित्रफितीतून कचरा ही गंभीर राष्ट्रीय समस्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रबोधन करण्यात आले आहे.
कचरा समस्येवर ‘चिंटू आणि गँग’ गांभिर्याने विचार करीत असते. त्यावेळी आधुनिक संत गाडगेमहाराज अवतरतात आणि त्यांचे शंका-समाधान आणि प्रबोधन करतात, ही देखाव्याची मध्यवर्ती कल्पना आहे. चिंटू गाडगेबाबांकडे सेल्फीसाठी विचारणा करतो, तेव्हा बाबा ई-कचर्याची माहिती देतात आणि ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ भजन करीत प्रेक्षकांचा सेल्फी काढण्याचा आग‘ह पूर्ण करतात.
शुभम वाईकर यांनी गाडगेबाबांची भूमिका साकारली आहे. नील दगडे (चिंटू), श्रेया हेंद्रे (मीनी), साईराज शिर्सेकर (पप्पू), समर्थ धुमाळ (राजू), शुभांगी नेटके (नेहा), साई बढे (बगळ्या), विश्वजीत भवारी (सोनू) या बाल कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दहावी व्या‘यानमाला, आजीबाईंचा भोंडला, सार्वजनिक दिवाळी, सरस्वती महोत्सव, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन असे मंडळाचे प्रमख सामाजिक उपक‘म आहेत. या वर्षी मंडळ ४२ वे वर्ष साजरे करीत आहे.
मुकेश खामकर मंडळाचे अध्यक्ष असून, अक्षय माने, आदेश काळे, अथर्व जोशी, निरंजन गोरडे, अभिषेक पवार, पराग कानिटकर, निलेश मांडवकर मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आहेत.