पुणे- गडकरींनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा फोडण्यात आला; पण तो अद्याप बसवला गेला नसल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मनोहर मंगल कार्यालयात कलाकारांची एकत्रित बैठक झाली. त्याला दिग्दर्शक अमोल पालेकर, नाटककार सतीश आळेकर, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, शरद पोंक्षे, पुष्कर श्रोत्री, पुरुषोत्तम बेर्डे, श्रीरंग गोडबोले, संध्या गोखले, शुभांगी दामले, विभावरी देशपांडे, स्मिता शेवाळे, हृषीकेश जोशी, संदीप खरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुष्कर श्रोत्री यांचे झालेले भाषण पहा आणि ऐका …