Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“जी. टी. टी. फाउंडेशन च्या ‘WeChimni’ उपक्रमातून स्त्रियांना मिळणार व्यवसाय-स्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी”

Date:

पुणे – आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी जी.टी. टी.फाउंडेशनच्या नवीन संकेतस्थळ‘WeChimni’ या प्रकल्पाचा उदघाटन समारंभ,दिनांक २२ मार्च २०२२ रोजी, सुमंत मूलगावकर स्टेडियम, पुणे येथे पार पडला. जी.टी.टी.फाउंडेशन आणि RBL बँकेमार्फत हा प्रकल्प महिलांचे सक्षमीकरण आणि आधुनिक व्यवसायप्रणाली यावर आधारलेला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी जेष्ठ समाजसेवक, पर्यावरणवादी आणि कृषी शास्त्रज्ञ, कृषिरत्न डॉ.बुधाजीराव मुळीक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अतिथी म्हणून टेस्टी बाईट चे सहसंस्थापक रवी निगम उपस्थित होते. माजी महापौर कमल व्यवहारे, यांची उपस्थिती होती. या सोबत RBL बँकेचे प्रतिनिधी आणि GTT फाउंडेशनच्या संस्थापिका उमा गणेश देखील उपस्थित होते.

जी.टी.टी. फाउंडेशन हि सामाजिक संस्था आहे.समाजसेवेला प्रथम स्थानी मानणारी हि संस्था, समाजातील अल्पउत्पन्न असलेल्या घटकांसाठी नेहमीच निरनिराळे प्रकल्प राबवत असते. या प्रकल्पातून समाजातील प्रत्येक घटक स्वावलंबी आणि स्वतंत्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. यावेळी हि जी.टी.टी. फाउंडेशनने स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वतंञ करण्यासाठी WeChimni eकॉमर्स वेबसाइट हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. ही एक ई कॉमर्स Website आहे, याच्या माध्यमातून छोट्या घरगुती प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजिकांना त्यांची प्रतिभा आणि व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे आणि त्यांचे उत्पादनही वाढण्यास नक्कीच मदत होईल. स्त्रियांना त्यांची क्षमता जगभरात सिद्ध करता यावी, त्यांच्या स्वप्नपूर्तीचे मार्ग मोकळे व्हावे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा या प्रकल्पाचा मूळ उद्द्येश्य आहे.

प्रमुख पाहुणे डॉ बुधाजीराव मुळीक आणि रवी निगम यांच्या हस्ते www.wechimni.org संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले.सर्व आमंत्रितांना आणि प्रेक्षकांना Website ची माहिती देण्यात आली. RBL बँकेच्या एचआर, सीएसआर आणि अंतर्गत ब्रँडिंग प्रमुख शांता वॅल्युरी गांधी यांना उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी व्हिडिओ क्लिप च्या माध्यमाने महिला उद्योजकांना संबोधित केले. “भारताच्या जीडीपी वाढीमध्ये महिलांचे योगदान १८% आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून हे योगदान जास्तीती जास्त प्रमाणावर व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.” अशी माहिती शांता वॅल्युरी गांधी यांनी दिली. उद्योजकांच्या उत्पादनांना B२B आणि B२C प्रमाणावर मागणी वाढावी आणि त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी. या संधीचा अधिकाधिक महिलांनी फायदा घ्यावा आणि त्यांची ध्येयपूर्ती करावी अशी इच्छा यावेळी शांता वॅल्युरी गांधी यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कृषिशास्त्रज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी ही महिलांशी संवाद साधला.“स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीत धैर्य न गमावता योग्य निर्धार घेऊन आपली प्रगती करतात. स्त्री नेहमीच समाजाच्या विकासामध्ये अनमोल योगदान देते.” असे मत मुळीक यांनी मांडले.

टेस्टी बाईट चे संस्थापक रवी निगम यांनी नारीशक्तीचा पुरजोर पुरस्कार करत जमलेल्या महिलांचे मार्गदर्शन केले. “ छोट्या व्यवसायातून मोठी प्रगती होऊ शकते, कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना ग्राहकांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे.” असा सल्ला निगम यांनी दिला. यावेळी, महिला उद्योजकांनी बनवलेले आकर्षक वस्त्र परिधान करून जी.टी.टी. फाउंडेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी फॅशन शो सादर केला. हा फॅशन शो कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या कार्यक्रमामध्ये महिला उद्योजक बहुसंख्य प्रमाणात उपस्थित राहिल्या होत्या.

स्त्री सक्षमीकरणासाठी WeChimni कश्या प्रकारे सहाय्य करेल, उत्पादन वाढीत कसा फायदा होणार याबाबत जी.टी.टी. फाउंडेशनच्या संस्थापिका उमा गणेश यांनी दिले. महिला उद्योजिका रंजना जगताप आणि जान्हवी सोगम या लाभार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.जी.टी.टी.फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा शर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख करून दिली.फाउंडेशनचे डिरेक्टर ऑफ ऑपरेशन्स सागर काबरा यांनी कार्यक्रमाची सांगता केली.गंधाली देशपांडे आणि नेहा ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात...

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज...