पुणे- भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या काळातील प्रभात फिल्म कंपनीचा स्टुडिओ, चित्रपट निर्मितीची प्रकि‘या, ते बनविण्याचे विविध टप्पे, संकलन, ध्वनिमुद्रण, दिग्दर्शन याची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी ‘फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) सर्व रसिकांना पाहाण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती. या उपक‘माला रसिकांनी मोठ्या सं‘येने भेट देऊन प्रतिसाद दिला.
आमदार विजय काळे यांनी पाठपुरावा केल्यानंतर हे राष्ट्रीय संग‘हालय आज खुले करण्यात आले होते. आज दोन हजारहून अधिक रसिकांनी भेट दिली. कोल्हापूर आर्टस ऍण्ड कॉमर्स कॉलेज, बारामती जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन, औंध आयटीआय, नलिनीताई दोडे विद्यालय, कि‘सपिम होम या शिक्षण संस्थांचे विद्यार्थी आले होते. गोवा, केरळ, बडौदा, सातारा या ठिकाणाहून नागरिक आले होते. चित्रपटनिर्मिती आणि टेलिव्हिजन या विषयी रसिकांमध्ये खूप प्रश्न होते. त्यांचे शंकासमाधान करण्यात आले. १९६० ते २०१६ या कालावधीतील नामवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होतीा.
संस्था पाहाण्यासाठी आज नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांचा व तरुणांचा मोठा समावेश होता. ‘एफटीआयआय’मध्ये कशाप्रकारचे काम चालते याबाबत सर्वसामान्य रसिकांमध्ये कुतूहल आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत या संस्थेचा महत्वाचा वाटा आहे. संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला. जया बच्चन, शबाना आझमी, नसरुद्दीन शहा, ओम पुरूी, संजय लीला भन्साळी यांच्यासह अनेक नामवंत दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
सर्वसामान्यांना या संस्थेबद्दल असणारे कुतूहल लक्षात घेऊन ती पाहाण्यासाठी खुली करावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला संचालक आणि संस्थेच्या कर्मचार्यांनी प्रतिसाद दिला. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणारे विद्यार्थी आणि अभ्यासक रसिकांसाठी ही शैक्षणिक भेट अधिक महत्वाची असल्याचे मत आमदार विजय काळे यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थी आणि रसिकांचा प्रतिसाद लक्षात घेता दरवर्षी ठराविक दिवस संस्था खुली ठेवण्याचे आश्वासन संचालकांनी दिले आहे. उद्या (रविवारी) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत एफटीआयआय सर्वांसाठी खुली राहणार असल्याची माहिती संचालक भूपेंद्र कैन्थोला यांनी दिली.


