पुणे- ‘कोणी घर देता का घर ‘ अशी आरोळी साधारणतः सामान्य असलेल्या सर्वांच्याच आयुष्यात सुरु असते . आयुष्यभर पी पी साठवून तर कोणी बँकेतून कर्ज घेवून घर कधी होते यासाठी आयुष्य वेचत असतो . हडपसर येथे हन्देवाडीत घर घेण्यासाठी गेलेय ८० सामान्य ग्राहकांची आणि बँकेची हि फसवणूक केल्याचा प्रकार पुणे पोलीसांनी एका फिर्यादीवरून उघडकीस आणला आहे . याप्रकरणी सुरज रमण भुजबळ आणि रणजीत जगन्नाथ भुजबळ या भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन च्या महाभागां विरुध्द गुन्हा नोंदविला आहे
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि अपर्णा तिवारी वय ३७ या महिलेने प्रथम फिर्याद नोंदविली आहे . स. न. ६५, हिस्सा न. ६अ /६ब/२ब/१ तसेच ३ ब येथील जागेचे मुल मालकाकडून कोणतेही कायदेशीर व्यवहार पूर्ण न करता , या भुजबळ यांनी येथे बांधकाम सुरु केले त्याची जाहिरात केली आणि टायटल क्लियर आहे असे सांगून ग्राहकांबरोबर आर्टिकल ऑफ अग्रीमेंत या दस्ताची नोंदणी हि केली बँकेला हि ५५ टक्के बांधकाम झाल्याचे खोटे दाखविले . फिर्यादीची सुमारे १७ लाखाची आणि अन्य सात साक्षीदारांची मिळून १ कोटी १० लाकःची फसवणूक केली बँकेकडून कर्जाचे चेक हि लोकांनी घेतले . अशाप्रकारे ८० ग्राहकांसह बँकेची फसगत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून पोलीस उपनिरीक्षक एस एस वाघचौरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत .