पुणे :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भारत विरोधी घोषणांच्या निषेधार्थ पुण्यातील फ्रेंड्स ऑफ बीजेपी ‘तर्फे शनिवार वाड्या जवळ गाडगीळ पुतळा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती.
फ्रेंड्स ऑफ बीजेपी ‘च्या प्रदेश सह समन्वयक उषा बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित निदर्शनांना जोरदार प्रतिसाद मिळाला . ‘नही चलेगी ,नही चलेगी ,देश के साथ गद्दारी नही चलेगी ‘,’वन्दे मातरम ‘ अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या .
पंत प्रधान आणि देशाच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही तडजोड करणार नाही . भारत विरोधी प्रवृत्तींच्या विरोधात समाजाने आवाज उठविण्याची वेळ आली आहे असे बाजपेयी यांनी यावेळी सांगितले . उषा बाजपेयी ,मुकुंद वर्मा ,जयंत मोहिते ,विद्यानंद शेट्टी ,चंदन गारवे इत्यादी उपस्थित होते

