दिल्लीत महिलांना रोज मोफत बस प्रवासाची सुविधा , पुण्यात का नाही ? आप चा सवाल

Date:

पुणे- निव्वळ ठेकेदार आणि विशिष्ट राजकारणी यांचे उथळ पांढरे करता करता कायम तोट्यात राहणाऱ्या पीएमपीएमएल ने महिन्यातून एकदा महिलांना मोफत प्रवासाची जाहीर केलेली योजना हि कशी फसवी आहे हे स्पष्ट करत , दिल्लीत महिलांना रोज मोफत बस प्रवासाची सुविधा ,मग पुण्यात का नाही ? असा सवाल आप च्या मंजुषा नयन, जयश्री डिंबळे, ज्योती ताकवले, आरती करंजवणे, वैशाली डोंगरे, माधुरी गायकवाड, सेंथिल अय्यर, सुदर्शन जगदाळे या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. काल पीएमपीएल प्रशासनाने महिलांसाठी दर महिन्यात ८ तारखेला तेजस्विनी बसमध्ये मोफत व सेवा जाहीर केली. आम आदमी पार्टी या निर्णयाचे स्वागत करत आहे. परंतु हीच योजना यापूर्वीही २०१८ ला जाहीर करण्यात आली होती हे विसरून चालणार नाही. त्याच प्रमाणे ही सुविधा फक्त या तेजस्विनी प्रकारच्या बसेस मध्ये दिली जाणार आहे, या मध्ये २१०० पैकी फक्त ३० बस गाड्या ह्या तेजस्विनी प्रकारात आहेत आणि त्याही अवघ्या १० मार्गावर धावत असतात. त्यामुळे याचा फार कमी महिलांना लाभ मिळणार आहे. खरं तर नागरिकांच्या डोळ्यात ही धूळफेक आहे. प्रशासनाला जर हे करायचं होत तर ही बस सेवा संपूर्ण बसेसमध्ये आणि आणि कायमस्वरूपी करायला हवी होती. तसं करता येणे शक्य आहे हे आम आदमी पक्षाने मागील महिन्यात पीएमपीएल फाईल या उपक्रमांतर्गत घेतलेल्या कार्यक्रमात सप्रमाण सिद्ध केले होत. असं असतानाही केवळ आपण काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी किंवा कुणाच्यातरी राजकीय फायद्यासाठी अशी सेवा तात्पुरती आणि अपुरी चालू करणे योग्य नाही. तरीही आगामी काळात प्रशासन आम आदमी पक्षाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि सर्व महिलांसाठी सदर बस सेवा मोफत उपलब्ध करून देईल अशी आशा करायला हरकत नाही.
आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केल्यानंतरही तेथील बस सेवा सुमारे सव्वा दोन कोटी रुपये फायद्या मध्ये आहे. पुण्यामध्ये हे घडू शकते त्यासाठी खरी गरज आहे ती व्यावसायिक पद्धतीने पीएमपीएल चा गाडा हाकणे. आज तागायत पीएमपीएल ठेकेदारांना, इतर मालपुरवठा करणाऱ्यांना आणि राजकारण्यांना पैसा मिळवून देणारी दुभती गाय असं तिच्याकडे पाहिले गेले. जर व्यवसायिक पद्धतीने ही सेवा चालवली तर बस सेवा फायद्यात तर येईलच परंतु शहरातील सर्व महिलांना मोफत बससेवा देखील देता येणे शक्य आहे. आम आदमी पक्ष पुण्यात सत्ते मध्ये आल्यानंतर किंवा आला नाही तरीही या विषयाचा पाठपुरावा करून महिलांना ना मोफत बस सेवा देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आबा बागुल संपूर्ण परिवारासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल …

ठाणे |पुणे- संपूर्ण हयात ज्या परिवाराने कॉंग्रेस मध्ये घालविली,...

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...