पुणे :
फ्रान्स मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुणे भेटीवर आलेल्या १० फ्रेंच पाहुण्यांनी पुण्याच्या ऐतिहासिक ,सांस्कृतिक महत्वाच्या स्थळांना भेटी देऊन पुण्याच्या विविधतेचा आनंद लुटला .
लिओपाल्ड यांच्या नेतृत्वाखालील गटाने शनिवार वाडा ,आदिवासी संग्रहालय ,ललित कला केंद्र ,डॉ नितीन उनकुले यांचे योग प्रशिक्षण केंद्र ,मुरुडकर झेंडेवाले ,दागिने निर्मिती प्रकल्प ,अशा ठिकाणांना भेटी दिल्या . पालिकेत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाला उपस्थित राहिल्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांनी या सदस्यांचा सत्कार केला . वन्य जीवनावरील माहितीपट देखील त्यांनी पाहिला . फ्रांस मित्र मंडळाच्या पुण्यातील यजमानांच्या घरी राहून त्यांनी भारतीय जीवन शैलीचा परिचय करून घेतला .
डॉ सतीश देसाई ,भारती भिडे ,उल्हास जोशी ,चंद्रकांत कुडाळ ,प्रदीप कोपर्डेकर ,जयंत शाळीग्राम ,नितीन मेमाणे ,रवी चौधरी ,डॉ दीपक मांडे ,स्मिता पेठे , नितीन मेमाणे इत्यादींनी या भेटींचे संयोजन केले .

