बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा

Date:

पुणे – जमीन दस्त तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह चौदाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश निवृत्ती भोसले (रा. लॉरी इस्टेट, बाणेर), विनोद गोयंका (रा. कर्मयोग, एनएस रोड, जुहू, मुंबई), विकास रणबीर ओबेरॉय (रा. एनएस रोड, जुहू, मुंबई), सिद्धार्थ राजेंद्र मयूर (रा. लकाकी रस्ता, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), सुमन निवृत्ती निकम, नितीन निवृत्ती निकम, देवकी निलेश निकम, नीलम विकास सूर्यवंशी, अक्षय विकास सूर्यवंशी (सर्व रा. संगमवाडी), सपना अभय जैन (रा. आर्यम बंगला, श्रद्धा कॉलनी, जळगाव), कल्पना प्रमोद रायसोनी (रा. जळगाव), विकास विठ्ठलराव पवार, विपुल विठ्ठलराव पवार (दोघे रा. कपीलनगर, खाणगाव रस्ता, लातूर), ज्योती राजेंद्र पवार (रा. शिवर्कीती, घोरपडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारतीय नोंदणी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरेदीखत दस्त, विकसन करारनामा या कागदपत्रांमध्ये फेरफार केला तसेच भारतीय नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याचे सहदुय्यम निबंधक संगावार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चेतन काळूराम निकम यांनी याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक आठ येथे तक्रार अर्ज दिले होते. सात दस्तांबाबत त्यांनी तक्रार केली होती. या तक्रार अर्जाची चौकशी सह जिल्हा निबंधक मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी चौकशी सुरू केली होती. चौकशीत उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

संगमवाडी येथे चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोटया नोंदी करण्यात अल्या. दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाºया व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आले. काही खरेदी खतातील सव्र्हेक्षण क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठाा यांच्या जमिनीची देखील चुकीची नोंद केली, असे फिर्यादीत संगावार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...