-कात्रजच्या प्रश्नांवरून अमृता अजित बाबर आक्रमक –
पुणे- कात्रज चौकात नमेश बाबर यांच्याकडून उपोषण सुरू असताना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका अमृता अजित बाबर यांचे हि आंदोलन कात्रजच्या विविध प्रश्नांवर सुरु असताना आज पोलिसांनी लाठीमार करून या आंदोलकांना हुसकावून लावल्याचा आरोप आणि चर्चा सुरु झाली आहे ज्यामुळे कात्रजच्या राजकारणात आता वेगवेगळे रंग भरू लागणार असल्याचे स्पष्ट चिन्ह आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी चे गृहमंत्री असताना, राष्ट्रवादीचे आंदोलन अशा पद्धतीने चिरडून टाकण्याचा आरोप होऊ लागल्याने या घटनेस आता महत्व प्राप्त होणार आहे.दरम्यान पोलिस सूत्रांनी सांगितले कि प्रतिबंधित क्षेत्र असलेलेया पंपिग स्टेशन येथे घुसू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवून माघारी जाण्याची विनंती करण्यात आली मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान वेळेवर पाणी सोडा अशी मागणी घेऊन अमृता बाबर या काही महिलांसह पंपिग स्टेशन येथे गेल्या असताना तिथे या महिलांना पुरुष पोलिसांनी अडवून धक्काबुकी केल्याचा आरोपही करण्यात येतो आहे.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही विकास न झाल्याने राष्ट्रवादीचे या परिसरातील नेते स्वर्गीय अजित बाबर यांच्या पत्नी अमृता बाबर आणि अजित बाबर यांचे बंधू नामेश बाबर यांनी रविवारी आंदोलन सुरु केले होते,नमेश बाबर यांचे आमरण उपोषण सुरू होतं.मागील दोन दिवसांपासून इथे गावकऱ्यांनी ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज हुसकावून लावलं. कात्रज चौकात नमेश बाबर यांच्याकडून उपोषण सुरू होतं. नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध सुरू होता.पुणे महापालिकेत कात्रजचा समावेश होऊन २५ वर्ष लोटली, तरी मूलभूत सुविधा व विकास होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी कात्रजसह, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडीतील नागरिक देखील उपस्थित होते. कात्रज व अन्य समाविष्ट गावातील पाणीप्रश्न, वाहतुकीची समस्या यासह महापालिकेचा दवाखाना, खेळाची मैदाने, ई-लर्निंग स्कूल, स्वारगेट-कात्रज मेट्रो अशा प्रकल्पाबाबत अन्याय झाल्याची नागरिकांची संतप्त भावना आहे.यामुळे हे आंदोलन सुरु होते.
आंदोलन कर्त्यांच्या मागण्या –
१) वर्षानुवर्षे पाणी प्रश्न ,वाहतूक समस्या. दिवसेंदिवस उग्रच होत गेली.
२) गुंंठेवारीचा दंड तीनपट रद्द करा -दंड माफ करा
३)निव्वळ आमच्याकडून कर वसुली -सुविधा देण्यास टाळाटाळ.

