पुणे : माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे दीर्घ आजाराने गुरुवार पेठेतील राहत्या घरी निधन झाले. ‘अक्का’ नावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्या 69 वर्षाच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्यात आजारी होत्या. सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 2 वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा विकार होता. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या
.1998-99 मध्ये वत्सला आंदेकर महापौर होत्या. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी त्यांनी वत्सला आंदेकर यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती . सुरेश कलमाडी यांनी उपेक्षित घटकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाचा सन्मान पोहोचविला .त्यातील आंदेकर या एक होत्या . त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार करण्याची कोणाची हिम्मत होत नसे .त्यांच्या कारकिर्दीत कधीही कुठल्याही टेंडर साठी विवाद झाल्याचे हि अक्धी दिसले नाही .नागरी सुविधा देण्यासाठी त्यांचा सोडा ,त्यांच्या पीए चा फोन पुरेसा होता .
माजी महापौर वत्सलाताई आंदेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“पुण्याच्या माजी महापौर वत्सलाताई आंदेकर यांच्या निधनाने पुणे शहरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील धडाडीच्या कार्यकर्त्या हरपल्या आहेत. पुणे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून वत्सलाताईंनी शहराच्या विकासात भरीव योगदान दिले. आंदेकर घराण्याला असलेला राजकीय, सामाजिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. वत्सलाताईंच्या कुटूंबियांना, आप्तांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. वत्सलाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
-उपमुख्यमंत्री अजित पवार.

