माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले

Date:

कधीकाळी मोठा रुबाब असलेल्या मंत्री राहिलेल्या देशमुखांची आत्ताची अवस्था अत्यंत दयनीय

मुंबई- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात चक्कर आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.26 ऑगस्ट म्हणजेच आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता अनिल देशमुख तुरुंगातच चक्कर येऊन पडले. यावेळी हादरलेल्या जेल प्रशासनाने तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. यावेळी त्यांचा रक्तदाब अतिशय वाढल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना लागलीच जेजे रुग्णालयात नेण्यात आले. दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवले जाणार असल्याचे जेल प्रशासनाने सांगितले.कधीकाळी मोठा रुबाब असलेल्या मंत्री राहिलेल्या देशमुखांची आत्ताची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जेलमध्ये त्यांची प्रकृती पूर्णपणे खंगली असून, डोक्यावरचे केस पांढरे झाल्याने त्यांना ओळखणेही कठिण झाले आहे.

देशमुख प्रकृती खालावल्याने कोसळल्याचे समजते . त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिकारी यांनी दिली.

अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीत गृहमंत्री पद भूषवलेले आहे. 10 महिन्यांपूर्वी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने याबाबत चौकशी केली होती.

एप्रिल महिन्यात अनिल देशमुखांवर याच जे. जे. रुग्णालयात खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयात उपाचाराची मागणी केली होती. मात्र, ईडीने केलेल्या विरोधामुळे त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. दोन महिन्यापूर्वी देखील त्यांची तब्येत अशीच बिघडली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणी मोदी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको! 

पुणे-‘एपस्टीन फाईल्स’मधून समोर आलेल्या धक्कादायक व देशाला हादरवणाऱ्या खुलाशांवर...

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्जमुंबई, दि....