मेट्रोसाठी -मंडईतील व्यवसायिक गाळे महापालिकेने उखडून टाकल्याने तीव्र असंतोष

Date:

पुनर्वसनाबाबत बोलायला ‘कोरोना’ चे कारण … पाडायला मात्र कोरोना नाही …

सर्व काही कोरोनाच्या नावाने लॉक-महागाई आणि ठेकेदारी कामे मात्र लॉक नाहीत

सरकारची वृत्ती नागरिकांच्या पोटावर पाय देणारी…. ठेकेदारी पोसणारी

पुणे- देशात कोरोनाचे काहूर उठलेले असताना सरकारने सर्व काही लॉक केले ,महागाई मात्र लॉक केली नाही अशात बेरोजगारी वाढलेली असताना ,रस्त्यावरील मोठमोठ्या अनधिकृत नव्या इमारती उभ्या राहत असताना त्यास हि कोरोना च्या कारणाने अप्रत्यक्ष संरक्षण देत असताना दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेने आज सकाळी सकाळी मंडई येथील व्यवसायिकांचे गाळे उखडून टाकले .हि कारवाई कोणतीही कल्पना अथवा नोटीस न देता ,स्थानिक व्यवसायिकांना विश्वासात न घेता अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत येथील व्यावसायिकांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि न्यायालयातही जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

येथील व्यावसायिकांचे म्हणणे असे आहे कि,’ मंडई येथून भुयारी मेट्रो काम चालू आहे आम्ही वेळोवेळी महापालिका आणि मेट्रो ला सहकार्य करण्यास तयार असल्याचे कळवले होते परंतु आधी आमचे पुनसर्वसन करा अशी आमची मागणी होती .शिवाय मेट्रोच्या आराखड्यानुसार कारवाई करावी.
महा मेट्रो ,पुणे महानगरपालिका चे आयुक्त, उपायुक्त, मंडई चे अधिकारी तसेच राजकीय नेते व पोलीस प्रशासन चे अधिकारी यांच्या संगन मताने उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर कारवाई केली तसेच करोना नियमाचेही उल्लंघन झाले आहे कोणतीही स्थानिकांची परवानगी न घेता आज ही कारवाई अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप अध्यक्ष सोमनाथ आप्पा काची यांनी केला आहे.यासाठी लवकरच मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .या कारवाईचा स्थानिक व्यावसायिक ,मंडई फळ विक्रेता संघ यांनी निषेध केला आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...

शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले,विनोद तावडे, ज्योती वाघमारे,माया ईवनाते आणि रामराव वडकुते राज्यसभेवर

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी जाणाऱ्या नेत्यांची नावे आता समोर...