पुणे-एक जिल्हा एक व्हीआयपी हे धोरण स्वीकारून यंदा पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करणार असल्याने नव्याने पुन्हा मंत्री झालेले चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या ऐवजी कोल्हापूरला ध्वजारोहण होईल असा निर्णय सरकारने घेतला असल्याचे येथे भाजपच्या कडून अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना जिल्ह्या – जिल्ह्यांत १५ ऑगस्ट रोजी दिमाखात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या समारंभात पुण्यात दोन व्हीआयपी आणि कोल्हापुरात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण असे होऊ नये यासाठी शुक्रवारी राज्य सरकारने एक बदल केला. नव्याने मंत्री झालेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या ऐवजी कोल्हापूरला ध्वजारोहण होईल असा निर्णय सरकारने घेतला. कारण पुण्यात राज्यपालांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. स्वतः राज्यपाल पुण्यात येणार असताना कोल्हापूरला एका मंत्र्याला पाठविणे शक्य झाले आणि दादांनी ही जबाबदारी स्वीकारली.असेही स्पष्ट करण्यात आले आहे.